India-paksitan Ceasefire : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होत असल्याचे घोषित केले.यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून ‘प्रे. ट्रम्प यांना हे सरपंचाचे अधिकार दिले कोणी?’ असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकस्त्र डागले आहे.
“भारतीय सेना, हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कोठे गेले याचा शोध लागू शकलेला नाही. भारत-पाक युद्धाची ठिणगी त्याच सहा दहशतवाद्यांनी टाकली व भडका उडाला, पण पेटलेल्या होळीवर प्रे. ट्रम्प यांनी पाणी टाकले व त्या होळीच्या बोंबा सरकार मारत आहे. प्रे. ट्रम्प यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनचे युद्ध थांबवले नाही. तेथे सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते ‘गाझा’तील जनतेचे शिरकाण पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात. प्रे. ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे! अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी नवा मास्टर प्लान; काय म्हणाले अजित पवार?
भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे. आमच्या राष्ट्रात कोणत्याही बाहेरच्या राष्ट्रास हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, पण अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्षात हस्तक्षेप केला असून भारताने ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर भारताने युद्धविराम स्वीकारल्याचे परस्पर जाहीर केले. तोपर्यंत भारतवासीयांना आणि भारतीय सैन्यदलास या शस्त्रसंधीची माहिती नव्हती. प्रे. ट्रम्प यांना हे सरपंचाचे अधिकार दिले कोणी?असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, जर भारतीय सीमेवर जैशच्या सात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखून त्यांना कंठस्नान घातले जाते. मग पहलगामच्या पर्यटनस्थळावर घुसून अंदाधुंद हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसे घुसू दिले? कसे मोकाट सोडले? त्यांना 26 भगिनींचा सिंदूर कसा पुसू दिला व हे केल्यावर त्यांचे पुढे काय झाले? हे प्रश्न निर्माण होतातच,’ असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
चिंताजनक!’कोलाम’ मध्ये यॅलेसेमियाचे प्रमाण 15 टक्के, आदिवासीबहूल भाग विळख्यात
भारतीय सेना, हवाई दल यांनी पाकिस्तानने भारतावर सोडलेले ड्रोन, क्षेपणास्त्र नाकाम केले. पाकड्यंना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कोठे गेले याचा शोध लागू शकलेला नाही. भारत-पाक युद्धाची ठिणगी त्याच सहा दहशतवाद्यांनी टाकली व भडका उडाला, पण पेटलेल्या होळीवर प्रे. ट्रम्प यांनी पाणी टाकले व त्या होळीच्या बोंबा सरकार मारत आहे. प्रे. ट्रम्प यांना भारत-पाकमध्ये शांतता नांदावी असे वाटते. प्रे. ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला नाहीत. ते एक व्यापारी आहेत.”अशी टीकाही उद्धव ठाकरेनी केली आहे.