चिंताजनक!'कोलाम' मध्ये यॅलेसेमियाचे प्रमाण 15 टक्के, आदिवासीबहूल भाग विळख्यात
नागपूर : अनुवांशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारी रक्ताशी निगडित व्याधी म्हणून थैलेसेमिया आणि सिकलसेलची गणना होते. याचे रुग्ण विशिष्ट समाजातच आढळतात, असं आतापर्यंत सांगितलं जात असे.पण, आदिवासीबहुल भागातल्या कोलाम समाजातही थैलेसेमिया आणि सिकलसेल अॅनिमिया वाहकांचे प्रमाण मोठे असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
केंद्र सरकारच्या मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाने शास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर हा अभ्यास केला. त्यातून ही धक्कादायक बाब समोर आली. विदर्भापुरता विचार केला, तर या विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात करंजी येथील कोलाम समाजातल्या नागरिकांचा अभ्यास केला. यात 540 जणांच्या रक्ताचे नमुने तपासले गेले. डीएनएची हिस्ट्री तपासल्यानंतर यात तब्बल 75 जण सिकलसेलच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. सरासरीने हे प्रमाण 13 ते 15 टक्क्यांपर्यंत जाते. पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या डीएनएची रचना तपासल्यानंतर त्यापैकी 30 जण सिकलसेलचे वाहक असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, तपासलेल्या नमुन्यांमध्ये 15 ते 20 टक्के थैलेसेमियावाहक असल्याचेही अभ्यासाचे पुरावे सांगतात.
बॅलेसेमिया, सिकलसेल हे आजार एकापिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा रुपाने संक्रमीत होतात. एकदा का जन्मतः त्याची बाधा झाली, की अखेरपर्यंत त्यातून सुटका नसते. त्यामुळे नव्याने वैवाहिक जिवन सुरू करणाऱ्याऱ्यांनी लग्नकरताना पत्रिका जुळवून पहावी. यात हरकत नाही. पण त्याहीपेक्षा रक्ताशी निगडीत चाचण्या केल्या तर भविष्यात हा आजार घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांना वाचविता येते. विज्ञानावर आधारित विचार केला तर भावी पिढ्यांना सदृढ आणि निरोगी आयुष्य देता येते.
-डॉ. विकी रुघवानी, बालरोग चिकित्सक, चॅलेसेमियातज्ज्ञ
लक्षणे
रोगप्रतिकारशक्ती कमी.
सांधे निर्षक्रय होणे,
डोळ्यांना त्रास होणे,
रेटिना खराब होणे,
यकृत, किडनीचा त्रास
केंद्र सरकारने अलिकडेच 21 प्रकारच्या दिव्यंगत्वाचा अपंग धोरणात समावेश केला आहे. त्यामुळे सिकलसेल, थेंलसेमिया सारख्या रक्ताशी निगडीत व्याधी घेऊन झुंजणाऱ्या रुग्णांना दिव्यांगांच्या धर्तीवर विशेष अधिकार मिळणार आहेत. शिवाय या दिव्यांग धोरणानुसार जिल्हा पातळीवर दिव्यांग प्रमाणपत्र देखील देण्याची घोषणा सरकारने केली होती. नागपूर हा राज्यात त्याची अंमलबजावणी करणारा एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे चॅलेसेमियाग्रस्तांना नागपुरातच दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे.