Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्याने देशासाठी एवढं केलं याच महाराष्ट्रावर आज ‘ही’ वेळ आलीये- राज ठाकरे

‘अलिबाबा आणि त्यांचे चाळीस जण गेले. यांनाच कंटाळून गेले. मुख्यमंत्री असताना कोविड काळात कोणालाही भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडायला लागले. मग नंतर कळालं. सुरत, गुवाहाटी. महाराज सुरत लूट करुन आले होते. पण हे महाराष्ट्रातून लूट करुन सुरतला गेलेले हे पहिलेच. एकनाथ शिंदे यांना एकच सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे यांच्या मागे जावून सभा घेऊ नका.’

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 22, 2023 | 10:01 PM
ज्याने देशासाठी एवढं केलं याच महाराष्ट्रावर आज ‘ही’ वेळ आलीये- राज ठाकरे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज शिवतीर्थावर (Shivtirhta) आयोजित पाडवा मेळाव्यात (Padwa Melava Live) बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आज महाराष्ट्र चाचपडतोय. अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्र बघतोय. नवीन उद्योग येत नाहीयेत. बेरोजगारी आहे. लोकं सरकारकडे बघतंय आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. आताच विधानसभेच्या निवडणुका लावा. जे काय व्हायचंय ते होऊन जावू देत अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर शब्दांचे आसूड ओढले.

‘मला लोकांनी विचारलं हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून कोणाला बघता. मला धर्माभिमानी हिंदुत्व हवंय. कारण मला माणसं पाहिजेत. मुस्लीम पण पाहिजे. पण जावेद अख्तर सारखे पाहिजे. द्वेषाने बघण्यासारखं काही नसतं. पण कुरापती काढत असतील तर त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तानाला दोन शब्द सुनवणारा मुस्लमान पाहिजे. पाकिस्तानात जाऊन त्यांनी सांगितलं की, आमच्या शहरात जो हल्ला झाला तो आम्ही नाही विसरणार. अशी माणसं मला अपेक्षित आहेत.’

[read_also content=”मशीदींवरचे भोंगे बंद करा नाहीतर आम्ही ते करतो, निर्णय घ्यावाच लागेल अन्यथा…- राज ठाकरे https://www.navarashtra.com/maharashtra/close-the-loud-speakers-on-the-mosques-or-we-do-it-a-decision-has-to-be-made-or-else-says-mns-chief-raj-thackeray-in-shivtirtha-padwa-melava-nrvb-377911.html”]

राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर भाषण करत असताना अनेक गौप्यस्फोट केले. राज ठाकरे यांनी यावेळी ‘शिवसेना फुटण्यासाठी आज उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे पक्ष सोडून जात असताना मी त्यांना फोन केला होता. त्यांना बाळासाहेबांना भेटायला ही घेऊन जाणार होतो. पण नंतर नारायण राणे यांना आणू नका असा निरोप आला.’ असंही सांगितलं

‘स्मरणशक्ती कमी असल्यामुळे आपण विसरतो. त्यामुळे पुन्हा आठवण करुन देतो. मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. मतदारांनी उन्हातानात मतदान करायचं मग हे खेळ खेळत बसणार. आकडेवारी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागितलं.’

‘अलिबाबा आणि त्यांचे चाळीस जण गेले’

‘अलिबाबा आणि त्यांचे चाळीस जण गेले. यांनाच कंटाळून गेले. मुख्यमंत्री असताना कोविड काळात कोणालाही भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडायला लागले. मग नंतर कळालं. सुरत, गुवाहाटी. महाराज सुरत लूट करुन आले होते. पण हे महाराष्ट्रातून लूट करुन सुरतला गेलेले हे पहिलेच. एकनाथ शिंदे यांना एकच सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे यांच्या मागे जावून सभा घेऊ नका.’

[read_also content=”नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडायचं नव्हतं पण… पक्षातून लोकांना काढणं त्याचा शेवट असा झाला https://www.navarashtra.com/maharashtra/narayan-rane-did-not-want-to-quit-shiv-sena-says-raj-thackeray-in-padwa-melava-at-shivaji-park-mumbai-377902.html”]

‘महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पेन्शन, शेतकऱ्यांचा विषय आहे. अवकाळी झाली शेतकऱ्यांना भेटा. सभा का घेत बसलेत. किती प्रश्न पडलेत. सध्या सगळीकडे सुशोभिकरण सुरु आहे. लाईटच्या खांब्यांना लाईट लावत बसलेत. संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार हेच कळत नाही. सुशोभिकरणाच्या नावाखाली १७ कोटी खर्च केले. ते जाणार मग नवीन लावणार, ते काय कायमचे आहेत.’

‘निवडणुकीच्या वेळेस का नाही म्हणाले. मोदी म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हा मग आक्षेप का घेतला नाही. ज्या लोकांनी तुम्हाला युती म्हणून मतदान केलं त्यांचं काय? ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबत जावून बसलात. पहाटेचा शपथविधी झाला. मग काकांनी डोळे वटारले. मग दुसरीकडे काही सुरु होतं.’

Web Title: Who has done so much for the country the time has come for maharashtra raj thackeray nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2023 | 10:00 PM

Topics:  

  • mahim
  • Mumbai
  • raj thackeray
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
3

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
4

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.