कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची ऑडिओ क्लिप गेल्या पंधरा दिवसापासून कुरुंदवाड शहरातील सोशल मीडियावर फिरत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून शहरात मुख्याधिकाऱ्यांच्या आणि कार्यालयीन अधीक्षक यांच्या विरोधात तणाव निर्माण झाला आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये नगरपालिकेत फ्रॉड करून जमवलेले पैसे खासदारांना देण्याचा उल्लेख मुख्याधिकाऱ्यांनी केला असल्यामुळे पैसे घेणारे ते खासदार कोण ? असा सवाल आता कुरुंदवाड शहरातील नागरिकांतून विचारला जात आहे. याची शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे
मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कुरुंदवाड शहरातील नागरिकांना अपशब्द वापरल्याने शहरात गेल्या तीन दिवसापासून मुख्याधिकाऱ्यांच्या आणि कार्यालयीन अधीक्षकांचे विरोधात तणाव निर्माण झाला आहे. पहिल्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दिंड शहरात काढण्यात आली. तिसऱ्या दिवशी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची कुरुंदवाड शहरातील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. हे सर्व घडत असताना या क्लिपमध्ये मुख्याधिकारी ज्या खासदाराला पैसे देणार होते तो खासदार कोण हा सवाल अद्यापही अनुत्तरीत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीत संबंधित खासदाराचे नाव समोर येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तो खासदार कोण अशी शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
हे सुद्धा वाचा – नार्कोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून महिलेची फसवणूक, 4 जणांना अटक
मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा
दरम्यान खासदाराचे नाव घेऊन हप्ते गोळा करून स्वतःची दुकानदारी चालविणाऱ्या कुरुंदवाडच्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून त्याचे निलंबन करावे, अन्यथा शिवसेना युवासेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा युवा सेना समन्वयक दिग्विजय चव्हाण (शिंदे गट शिवसेना) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.