Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

 उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड ९ मार्च रोजी होणार आहे. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राखीव असल्याने या पदासाठी तिरंगी चुरस निर्माण झाली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 08, 2026 | 03:16 PM
Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस (फोटो-सोशल मीडिया)

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • उदगीरच्या सभापतीपदासाठी रंगली तिरंगी चुरस
  • ९ मार्चला होणार निर्णय
  • आ. संजय बनसोडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
 

Udgir Panchayat Samiti: उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड ९ मार्च रोजी होणार आहे. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राखीव असल्याने या पदासाठी तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. उदगीर पंचायत समितीत एकूण १४ सदस्य असून त्यापैकी ८ महिला सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य, भाजपचे ३, काँग्रेसचे ३ व २ अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. अपक्ष सदस्य सुरेखाताई भांगे व चंद्रकांत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राकाँचे संख्याबळ ८ झाले असून पंचायत समितीवर त्यांचे बहुमत आहे.

सभापतीपदासाठी दावणगाव गणातील कोमलताई फुले, गुडसूर गणातील वनमालाबाई मरलापल्ले आणि शिरोळ (जा.) गणातील सुनीताताई राठोड या सदस्यांचे नाव चर्चेत आहे. सुनीताताई राठोड या बंजारा समाजाच्या असल्याने त्यांना प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी होत आहे, तर कोमलताई फुले या माळी समाजाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांचdhही पाठिंबा व्यक्त होत आहे. वनमालाबाई मरलापल्ले या माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांच्या मातोश्री असल्याने त्यांचीही दावेदारी मजबूत मानली जात आहे. दरम्यान, उपसभापतीपदासाठी भाजपकडून धनराज नादरगे यांचे नाव पुढे येत आहे. आ. संजय बनसोडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून सभापतीपदाची ‘आडथळ्याची शर्यत’ कोण जिंकणार हे ९ मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.

बहुचर्चित ठरलेल्या कळंब पंचायत समितीच्या सभापतीपदी अखेर शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री वरपे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रणिता चव्हाण यांची वर्णी लागली आहे. उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार हेमंत ढोकले व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. शिवसेना शिंदे गट, भाजप व ठाकरे सेना यांचे सदस्य संख्याबळ समान असल्याने निर्णयासाठी ईश्वर चिठ्ठीचा पर्याय अवलंबण्यात आला. लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यात राजश्री वरपे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापतीपदी निवड निश्चित झाली.

या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाचे मिळून आठ सदस्य तर ठाकरे सेनेचेही आठ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंना स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. सभापती व उपसभापतीपदाच्या या निकालानंतर महायुतीच्या गोटात समाधान व्यक्त केले जात असून हा निकाल राजकीयदृष्ट्‌या महत्त्वाचा मानला जात आहे. निवड झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकत्यांनी जल्लोष केला आहे.

Web Title: Whose seal is on the post of chairman tricolor election in udgir panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Politics
  • Nagar Panchayat
  • Panchayat Samiti Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.