Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 वंचित बहुजन आघाडी का सोडली?; वसंत मोरेंनी दिले उत्तर

पक्षातील अंतर्गत मतभेदांनंतर मनसेला जय महाराष्ट्र करुन  वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकही लढवली. पण निकालानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी वंचितला रामराम केला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 05, 2024 | 12:47 PM
social media

social media

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पक्षातील अंतर्गत मतभेदांनंतर मनसेला जय महाराष्ट्र करुन  वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकही लढवली. पण निकालानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी वंचितला रामराम केला आहे. येत्या 9 जुलैला वसंत मोरे अधिकृतरित्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

तत्पुर्वी त्यांनी वंचितची साथ का सोडली, यावरही भाष्य केले आहे. वंचित मतदारांनी आपल्याला स्वीकारले नाही. पुण्यातील मतदानाचा जो टक्का आपण पाहिला, त्यातून हेच दिसून येते. त्यामुळे मी आता स्वगृही परत जात आहे. असे वसंत मोरेंनी म्हटले आहे.

तसेच, वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला. ‘साहेब मला माफ करा. मला माझ्या पाठिशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करूनच मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी गुरुवारीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता मी पूर्वीच्या पक्षात जात आहे. त्यानंतर मला प्रकाश आंबेडकरांचा फोनही आला होता.  पण आता खूप उशीर झाला असल्याचे मी त्यांना सांगितले.

वसंत मोरे म्हणाले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या १८-१९ व्या वर्षीच मी पुण्यात शिवसेनेची शाखा सुरु केली होती. वयाच्या ३१ वर्षांपर्यंत मी शिवसेनेत होतो. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंचा संघर्ष पाहत आहे. मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.  येत्या 9 जुलैला मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एकेकाळी राज ठाकरेंचा शिलेदार म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. अनेकदा त्यांच्या इतर पक्षातील प्रवेशाच्या बातम्याही समोर आल्या, पण त्यांनी प्रत्येकवेळी  त्या खोट्या ठरवल्या. पण अलीकडच्या काळात पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे अखेर त्यांनी मनसेला सोडण्याचा निर्णय़ घेतला आणि ते  लोकसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीत गेले, पण लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Why did vasant more leave vanchit bahujan aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • Uddhav Thackeray
  • Vanchit Bahujan Aghadi
  • Vasant more

संबंधित बातम्या

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?
1

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
2

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…
3

Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
4

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.