Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईमधील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2026 | 09:00 AM
पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

Follow Us
Follow Us:

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सात सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे २१ लाख ६० रुपयांचा ह जा र निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News: मेट्रो-६ च्या कारशेडचा तिढा अद्याप कायम! तोडगा न काढताच मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला, मात्र लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.

अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाकवी याची व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.

शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा

आर्थिक सहाय्यामुळे २५ जून रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने १३ जुलै २०२६ रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत. वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे आभार मानले.

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!

66 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. त्याच भावनेतून प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती – रामेश्वर नाईक, कक्षप्रमुख, यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे काय?

    Ans: लिव्हर प्रत्यारोपण (Liver Transplant) ही अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये गंभीर आजाराने बाधित यकृत काढून त्याऐवजी निरोगी दात्याकडून मिळालेला यकृताचा भाग किंवा संपूर्ण यकृत प्रत्यारोपित केले जाते.

  • Que: जिवंत व्यक्ती लिव्हर दान करू शकते का?

    Ans: होय. योग्य वैद्यकीय निकष पूर्ण करणारी जिवंत व्यक्ती (बहुतेकदा जवळचा नातेवाईक) आपल्या यकृताचा काही भाग दान करू शकते. यकृत पुन्हा वाढण्याची क्षमता असल्यामुळे दाता आणि रुग्ण दोघांमध्येही कालांतराने यकृताची कार्यक्षमता सामान्य होऊ शकते.

  • Que: मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टसारख्या संस्थांची भूमिका काय असते?

    Ans: पात्र रुग्णांना महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, विविध ट्रस्ट आणि समाजसेवी संस्था सहाय्य करतात. मदत संबंधित निकष आणि मंजुरी प्रक्रियेनुसार दिली जाते.

Web Title: Wifes liver donation gives husband a new lease on life health update mumbai new

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Health Updates
  • Liver
  • Mumbai News

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
1

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका
2

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
3

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार
4

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.