Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

IIT Bombay Student Suicide : IIT Bombay विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात त्याचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि संचालक शिरीष केदारे यांना अटक करण्याची मागणी करत त्यांनी जातीय छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Sep 22, 2026 | 09:59 PM
iit bombay student suicide

iit bombay student suicide

Follow Us
Follow Us:
  • साहिलच्या वडिलांनी दुल्ला आणि केदारे यांच्या अटकेची मागणी केली.
  • जातीय अपमान, मानसिक छळ आणि धमक्यांचे आरोप रविंद्र वाकोडेंनी केले.
  • प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडे; परीक्षा हॉलचं CCTV फुटेजही तपासात.
 

IIT Bombay Student Suicide : IIT Bombay विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि IIT बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांच्या अटकेची मागणी केली आहे. FIRमध्ये दाखल करण्यात आलेल्या कलमांनुसार चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडे आहे.

रविंद्र वाकोडे यांनी आपल्या मुलावर मागील काही काळापासून मानसिक त्रास आणि जातीय स्वरूपाचा छळ झाल्याचा आरोप केला आहे. ‘माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं होतं. दुल्ला आणि केदारे यांना अटक झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. साहिलला जातीवाचक वक्तव्यं केली जात होती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असाही आरोप त्यांनी केला.

‘माझ्या मुलाला जातीवाचक बोलून त्रास दिला’

रविंद्र वाकोडे यांच्या म्हणण्यानुसार, “13 सप्टेंबरला ते साहिलला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी साहिलने आपल्यासोबत झालेल्या कथित त्रासाबाबत माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला. ‘मी वरच्या जातीचा आणि तू खालच्या जातीचा’ अशा प्रकारची वक्तव्यं करून साहिलला डिवचलं जात होतं,” असा आरोप त्यांनी केला.

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

या आरोपांवर IIT बॉम्बेने यापूर्वी आक्षेप घेतला आहे. संस्थेने साहिलने जातीय छळाबाबत SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासात स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

परीक्षा हॉलमध्ये नेमकं काय घडलं?

18 सप्टेंबरला साहिलच्या परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याचा आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ChatGPTचा वापर केल्याचा दावा IIT बॉम्बेने केला होता. त्यानंतर त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याचं वृत्त आहे. हे फुटेज आता तपासाचा महत्त्वाचा भाग ठरलं आहे.

IIT बॉम्बेने सुरुवातीच्या निवेदनातील काही बाबींवर नंतर स्पष्टीकरण देत घटनेची परिस्थिती तपासाधीन असल्याचं सांगितलं आहे. प्रा. दुल्ला यांना डीन पदावरून हटवण्यात आलं असून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

‘CCTV फुटेज द्या, सत्य समोर येऊ द्या’

साहिलने कॉपी केल्याच्या दाव्यावरही त्याच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे. परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज सार्वजनिक करून नेमकं काय घडलं, हे स्पष्ट करावं, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, साहिलच्या वडिलांच्या तक्रारीनंतर प्रा. दुल्ला यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांच करत असून, आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Web Title: Iit bombay student suicide sahil wakode case father demands arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Atrocity Act
  • IIT Bombay
  • Mumbai News
  • Student Suicide

संबंधित बातम्या

Milind Deora : फडणवीस – शिंदेंच्या कार्यक्रमाला खासदार मिलिंद देवरांना निमंत्रणच नाही? नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खरमरीत पत्र!
1

Milind Deora : फडणवीस – शिंदेंच्या कार्यक्रमाला खासदार मिलिंद देवरांना निमंत्रणच नाही? नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खरमरीत पत्र!

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!
2

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त
3

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ
4

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.