Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यप्राणी गणना! ६३५ वन्यप्राणी कॅमेऱ्यात कैद; ४४ मचणावरून घेतला निसर्ग अनुभव

ज्ञानगंगा अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने वन्यप्राणी गणना उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात ४४ मचाण व ४४ कॅमेऱ्यांद्वारे वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2026 | 06:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने वन्यप्राणी गणना उपक्रम उत्साहात पार पडला. चांदण्यांच्या प्रकाशात दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात ४४ मचाणांवरून निरीक्षण करत वन्यजीवांचा सखोल अभ्यास करण्यात आला. अचूक माहिती मिळवण्यासाठी अभयारण्यात ४४ कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यामुळे प्राण्यांची हालचाल टिपणे सोपे झाले. या गणनेदरम्यान एकूण ६३५ वन्यप्राणी कॅमेऱ्यात कैद झाले. यामध्ये २५ बिबटे, २९ अस्वल, २३१ रानडुक्कर, २० सायाळ, २२ ससे, ९ तडस, २८ भेडकी, १४५ निलगाय, ८१ मोर, ४ चिंकारा, १९ हरीण, २ खवलेमांजर, ३ रानमांजर, १६ माकड आणि १ सांबर यांचा समावेश आहे. ही आकडेवारी अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेचे स्पष्ट चित्र दाखवते. ( Wildlife Census in Dnyanganga Sanctuary )

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला बुलढाणा जिल्ह्यात ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’

खामगाव वनपरिक्षेत्रातील २३ आणि बुलढाणा परिक्षेत्रातील २१ अशा एकूण ४४ मचाणांवरून वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले. या उपक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी आणि वन्यजीव विभागातील अधिकारी सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या माध्यमातून स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता वाढली असून, पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली आहे. तसेच, मिळालेली माहिती भविष्यातील संवर्धन धोरण आखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (Dnyanganga Sanctuary )

Digitization of Documents : १५० वर्षांचा इतिहास आता एका क्लिकवर! राज्यातील ३० कोटी जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन सुरू 

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभयारण्यातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वाहन चालक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असून, जैवविविधतेचे महत्त्व समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवले जात आहे.

Web Title: Wildlife census in dnyanganga sanctuary 635 wild animals captured on camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Buldhana

संबंधित बातम्या

Buldhana News : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा; शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे आवाहन
1

Buldhana News : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा; शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे आवाहन

Buldhana News : जिल्ह्यातील पोलिस अंमलदार व हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या! ३ एनपीसी यांचा समावेश
2

Buldhana News : जिल्ह्यातील पोलिस अंमलदार व हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या! ३ एनपीसी यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.