
photo- social media
उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांचे न आवक आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच बाजारात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. दिवाळी जवळ आली असून, घरखर्च आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. मात्र, कमी उत्पादन आणि कभी दर यामुळे हातात पुरेशी रक्कम मिळण्याची शक्यता कमी आहे. यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी निसर्गाच्या मारासोबतच चाजारभावाच्या समस्येलाही सामोरे जात आहेत. शासनाने पौक नुकसानीची पाहणी * करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि सोयाबीनला योग्य भाव मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीकृष्ण टिकार सभापती म्हणाले की, सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यातच गतवर्षीच्या तुलनेत बाजारभावात घसरण झाल्याने शेतक-यांच्या वितेत भर पडली आहे. उत्पादन खर्च, मजुरी आणि फवारणीचा खर्च वाढलेला असताना अपेक्षित भाव मिळणे गरजेचे आहे, बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक आणि दर यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सत्याग्रह शेतकरी संघटनाचे प्रदेश अध्यक्ष, राजू नाकाडे म्हणाले की, यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतात एकरी ५० किलोती उत्पादन होत नसताना, बाजारात सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. सरकार केवळ हमीभाव जाहीर करून जबाबदारी झटकू शकत नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करून्ही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे सरकार वेळ काढू धोरण राबवत आहे. तसेच हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करून शेतक-यांना दिलासा द्यावा.