Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

करहर पोलीस औट पोस्ट चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत एका महिलेवर अवैध दारूविक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 01:20 PM
उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का?

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का?

Follow Us
Follow Us:

मेढा : जावळी तालुक्यात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आठ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. या कारवाईत दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित ठिकाणच्या बीट अंमलदारांवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर व्यसनमुक्त संघाचे राज्यअध्यक्ष यांनी संबंधित बिटअंमलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या बदलीनंतर पुणे येथून जिल्ह्यात आलेले पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी उपजीविकेसाठी अन्य मार्ग स्वीकारावा; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच ज्या बीटमध्ये अवैध धंदे आढळून येतील, त्या ठिकाणच्या बीट अंमलदारांवर थेट कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

या भूमिकेमुळे काही प्रमाणात अवैध व्यवसायांना आळा बसल्याचे दिसत असले, तरी जावळी तालुक्यातील या ताज्या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जावळी तालुक्यात दारूबंदी असतानाही उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अवैध दारूविक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे.

करहर चौकीपासून हाकेच्या अंतरावर अवैध दारूविक्री

करहर पोलीस औट पोस्ट चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत एका महिलेवर अवैध दारूविक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली. एकीकडे तालुक्यातील महिलांनीच दारूबंदीसाठी लढा दिला तर दुसरीकडे आउट पोस्ट चौकीपासून हाकेच्या अंतरावर एक महिलाच दारू विक्री करते ही शरमेची बाब आहे.

बीट अंमलदारावर कारवाई होणार का?

करहर चौकीपासून इतक्या जवळ अवैध दारूविक्री सुरू असताना स्थानिक पोलीस कर्मचारी आणि बीट अंमलदारांना याची माहिती नव्हती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे करहर आउट पोस्ट चौकीतील बीट अंमलदारावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेढा शहरातील तिघांवर कारवाई

उत्पादन शुल्क विभागाने मेढा पोलीस ठाण्याच्या परिसरातही कारवाई केली. आकाश आगलावे, मयूर गोरे आणि गणेश धनावडे यांच्यावरच फक्त कारवाई झाली आहे. मात्र, अजून बडे अवैध व्यवसायिक मात्र करवाईतून सुटले आहेत. मात्र, पोलीस ठाण्याच्या आसपासच अवैध दारूविक्री सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आल्याने मेढा पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर आता पोलीस प्रशासनानेही संबंधित ठिकाणांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधीत बिटअंमलदारांवरही कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

“एरवी जावळी तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर कारवाई करताना पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग एकमेकांकडे बोट दाखवून कारवाई टाळत होते. मात्र, आता उत्पादनने नेटाने पुढे येत कारवाई केली आहे. या कारवाईनंतर देखील आजही तालुक्यात राजरोसपणे या सर्व ठिकाणी दारू विक्री सुरूच आहे. त्यामुळे पोलीस प्रमुखांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधित बीट अंमलदारांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.”

–  विलासबाबा जवळ, व्यसनमुक्त संघ राज्यअध्यक्ष.

Web Title: Will action be taken against the excise officials following the raid demand raised with vilasbaba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
4

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.