
MNS-Mahavikas Aghadi Alliance
MNS-Mahavikas Aghadi Alliance: महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश करण्यास काँग्रेसकडून विरोध असल्याच्या चर्चांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करत पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, “मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मात्र, मुंबईबाहेरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेसोबत आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांना घेता येईल.”
Amruta Fadnavis: “एक दिवस मुख्यमंत्री करण्यात आलं तर…; अमृता फडणवीस यांनी दिलं हटके उत्तर
महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश होणार की नाही, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. पण दरम्यान नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसेने एकत्र लढण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने आता काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट झाली आहे.
काँग्रेसने आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली असून महायुतीमधील तीन पक्षांव्यतिरिक्त मनसे, बसपा किंवा वंचित आघाडी यांना आघाडीत घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. उद्या काही जिल्ह्यांमध्ये मनसे आणि काँग्रेस एकत्र लढली तर त्यात कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसे अधिकार आम्ही स्थानिक नेत्यांना दिले आहेत. पण आमची फक्त एक अट आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेसोबत आघाडी करायची नाही. कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्याला विरोध असेल. असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीकत वाढली आहे. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्रित आंदोलन केले होते. मतचोरी आणि मतदार यादीतील घोळाच्या विरोधातही मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आयोजित केलेल्या सभेत काँग्रेस आणि शरद पवार यांनी सहभाग घेतला होता. त्यनंतर मनसेलाही आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरु होत्या, त्याला काही काँग्रेस नेत्यांनी विरोधही केला होता.
महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सहभागी करून घेण्याच्या चर्चेला अखेर काँग्रेसकडून स्पष्ट उत्तर मिळाले आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मनसेला आघाडीत घ्यायचे की नाही, यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर या घडामोडींवरून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात होते.
काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सर्व संभ्रम दूर केला. “मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मात्र, मुंबईबाहेरील ठिकाणी मनसेसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांना घेता येईल.” वडेट्टीवार यांच्या या भूमिकेनंतर मनसेसोबतच्या संभाव्य आघाडीबाबत काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट झाली असून, महाविकास आघाडीतील चर्चांनाही आता नवं वळण मिळालं आहे.