Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाही”, आफ्रिकन युनियनमधील सिएरा लिओन देशाचे भारताला आश्वासन

यूएई आणि काँगो प्रजासत्ताक या देशांच्या दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल झाले. आफ्रिकन युनियनमध्ये सिएरा लिओनना विशेष स्थान आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2025 | 06:51 PM
आफ्रिकन युनियनमधील सिएरा लिओन देशाचे भारताला आश्वासन (फोटो सौजन्य-X)

आफ्रिकन युनियनमधील सिएरा लिओन देशाचे भारताला आश्वासन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

फ्रीटाउन, सिएरा लिओन : धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाहीत. दहशतवादाविरोधात भारताच्या पूर्णपणे पाठिशी आहोत, असे आश्वासन सिएरा लिओनचे उपसंरक्षण मंत्री निवृत्त कर्नल मोअना ब्रिमा यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सदस्य असलेल्या सिएरा लिओनने भारताला दिलेला पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे.

“… त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत”; चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

यूएई आणि काँगो प्रजासत्ताक या देशांच्या दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल झाले. आफ्रिकन युनियनमध्ये सिएरा लिओनना विशेष स्थान आहे. त्यांनी दहशतवादाविरोधात एकत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे. आज खासदार डॉ. शिंदे आणि शिष्टमंडळाने सिएरा लिओनचे उपसंरक्षण मंत्री निवृत्त कर्नल मोअना ब्रिमा यांची भेट घेतली. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, सिएरा लिओनलाही भारतासारख्याच वेदना जाणवतात. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये जे घडले, त्याबद्दल ते खूप सहानुभूतीने विचार करत आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सिएरा लिओन भारतासोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन या दहशतवादाविरुद्ध लढा दिला पाहिजे, असे मत उपसंरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी आणि ते का आवश्यक होते याविषयी माहिती दिली. गेल्या चार दशके मातृभूमीवर चालू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने काय-काय सहन केले आहे. त्यांना हे चांगलेच उमगले आहे की फक्त भारतच नव्हे तर उद्या ते स्वतःही दहशतवादाचे बळी ठरू शकतात. त्यामुळे आता एकत्र येण्याची वेळ आहे आणि या दहशतवाद पसरवणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या देशांविरोधात एकजूट होऊन आवाज उठवण्याची गरज आहे, अशी भूमिका एकमुखाने घेण्यात आली.

सिएरा लिओन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या भूमिका संयुक्त राष्ट्रांत महत्व आहे. या दहशतवादी घटना ते प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर ते जोरदार निषेध करणार असून धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. सिएरा लिओनसारख्या देशांनी अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करण्यासाठी एका समान व्यासपीठावर यावे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की सिएरा लिओन भारतासोबत ठामपणे उभा राहील, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ तेथील संसदेचे सभापती सेगेपोह सोलोमन थॉमस, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अब्दुलाई क्लौकेर आणि प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.

Raigad News : माथेरानमध्ये अवतरला स्वर्ग; पावसामुळे हवेत पसरली धुक्याची चादर

Web Title: Will not tolerate terrorism in the name of religion african union sierra leone assures india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.