Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावरकर मुद्यावरुन मविआत फूट पडणार? राऊतांना उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले…

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मविआत फूट पडणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे. तर संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 18, 2022 | 03:10 PM
सावरकर मुद्यावरुन मविआत फूट पडणार? राऊतांना उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेतील (Bharat Jodo Yatra) एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, हे त्या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात सावरकरांनी काम केलं, असे राहुल गांधी म्हणाले. इंग्रजासमोर बिरसा मुंडा झुकले नाहीत, ते आपल्या तत्वांवर ठाम होते. मात्र सावरकर हे दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली. असं राहुल गांधींना म्हटल्यावर सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर आज आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली असून, राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसलाय. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

[read_also content=”कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या राज ठाकरे व मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, भीम आर्मीची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/police-should-take-action-against-raj-thackeray-and-mansainiks-who-are-disrupting-law-and-order-bhim-army-demands-345974.html”]

दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मविआत फूट पडणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे. तर संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तर काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, मला असं वाटतं की याबाबत सगळ्यांनी विचार करायचा आहे. ज्या कारणावरती आम्ही एकत्र आलो, त्या कारणाच्यापूर्वी वैचारिक मतभेद दोन्ही पक्षांमध्ये होते. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. त्यामुळं यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असं सावंत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही असी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

भारत जोडो यात्रेतील (Bharat Jodo Yatra) एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, हे त्या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात सावरकरांनी काम केलं, असे राहुल गांधी म्हणाले. इंग्रजासमोर बिरसा मुंडा झुकले नाहीत, ते आपल्या तत्वांवर ठाम होते. मात्र सावरकर हे दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली.

Web Title: Will there be a split between the mva on savarkar issue replying to raut statement congress leader said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 03:10 PM

Topics:  

  • Congress
  • Jairam Ramesh
  • Rahul Gandhi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
4

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.