Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Winter Session : नागपुरात हिवाळीअधिवेशन पहिला दिवस; 33,788 कोटींच्या पुरवणी मागण्या

आमचे सरकार संविधानानुसार काम करत असून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परभणीत (संविधानाच्या प्रतिकृतीची) विटंबना करणाऱ्या एका मानसिक रुग्णाला अटक करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 16, 2024 | 03:25 PM
Assembly Winter Session : नागपुरात हिवाळीअधिवेशन पहिला दिवस; 33,788  कोटींच्या पुरवणी मागण्या
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर :  महायुती सरकारचा काल नागपुरात मोठ्या थाटामाटात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.  महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशीच राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’  योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद आहे. मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्या अर्थसंकल्पीय वाटपासाठी सरकारने मागितलेला अतिरिक्त निधी आहे.

मागील अर्थसंकल्पात, माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. 2.5 कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. दरम्यान, मासिक हप्ते 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांपर्यंत वाढवून बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल,अशी घोषणा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  तसेच याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राजभवनात मंत्र्यांचे नाव जाहीर होताच समर्थकांकडून एकच जल्लोष; जोरदार घोषणाबाजी, शिट्टयाही फुंकल्या

राज्याच्या विकासासाठी कोटींची तरतूद

सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 7,490 कोटी रुपये, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागासाठी 4,112 कोटी रुपये, नगर विकासासाठी 2,774 कोटी रुपये, ग्रामीण विकासासाठी 2,007 कोटी रुपये आणि आदिवासी विकास विभागासाठी 1,830 कोटी रुपयांची तरतूद आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्ततेसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे.

बीडमधील  सरपंचाच्या हत्या प्रकरणावर चर्चा

बीडमध्ये मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सोमवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान आणि गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येवरून परभणीतील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे जाब विचारला.

दोन्ही घटनांवर सभागृहात चर्चा करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले. ते म्हणाले, “मला विश्वास आहे की अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विरोधक सूचना देण्यास सहकार्य करतील. आमचे सरकार संविधानानुसार काम करत असून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परभणीत (संविधानाच्या प्रतिकृतीची) विटंबना करणाऱ्या एका मानसिक रुग्णाला अटक करण्यात आली आहे.

वाटीभर आवळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये आवळा सिरप, जाणून घ्या सिरप बनवण्याची सोपी रेसिपी

फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख

फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांचीही सभागृहात ओळख करून दिली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने आठ विधेयके पुन्हा मांडली, त्यापैकी काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही पंचायत समित्यांच्या उपाध्यक्षांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची दुरुस्ती होती.

10 डिसेंबर रोजी निधन झालेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एसएम कृष्णा यांनाही विधानसभेने श्रद्धांजली वाहिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवलेले कृष्णा 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. नुकतेच निधन झालेले माजी आमदार दिनकरराव जाधव यांनाही सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. जाधव यांनी 1980 ते 1988 या काळात राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Web Title: Winter session begins in nagpur supplementary demands of rs 33788 crore presented nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • Nagpur
  • Winter Session

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
1

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी
2

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
3

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण
4

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.