Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अटल सेतूवरुन उडी मारून महिलेची आत्महत्या

अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. त्यांच्या वडिलांनी तात्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 21, 2024 | 12:58 PM
अटल सेतूवरुन उडी मारून महिलेची आत्महत्या
Follow Us
Follow Us:

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरुन रविवारी दिनांक १७ मार्च रोजी एका डॉक्टर महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किंजल शाह (43) असं या महिलेचं नाव आहे. न्हावा शेवा पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अटलसेतूवरुन आत्महत्येचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. किंजल शहा गेल्या दहा वर्षांपासून नैराश्यात होत्या. नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे. त्या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. बाहेर काम आहे असं सांगून त्या रविवारी घरातून सकाळी निघाल्या होत्या. रविवारी दुपारी शिंदेवाडी येथे टॅक्सीत बसून निघून गेल्या. किंजल शहा यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे, असं सांगून टॅक्सी थांबवली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. या झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून टँक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट वडिलांना सापडली. अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. त्यांच्या वडिलांनी तात्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

सोमवारी संध्याकाळी उशिरा भोईवाडा पोलिसांनी न्हावा शेवा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची ओळख पटली. मात्र, त्या आधी भोईवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. ही महिला दादरहून 1.45 वाजता टॅक्सीत बसल्याचे आढळले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यांनी 2.14 वाजता अटल सेतूवरुन उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी अटल सेतू येथील समुद्रात मच्छिमारांची मदत घेतली जात आहे.

Web Title: Woman commits suicide by jumping from atal bridge mumbai crime case shivdi nhava sheva atal setu navi mumbai thane maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mumbai Crime case
  • Navi Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
1

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
4

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.