
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
छत्रपती संभाजीनगर – शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी नक्षत्रवाडी एमबीआरपासून केटली गार्डन येथील जलकुंभापर्यंत टाकण्यात आलेल्या १४०० मिमी व्यासाच्या मुख्य पाइपलाइनची हायड्रोलिक टेस्टिंग सुरू असताना बुधवारी दि.१२ अचानक प्रेशर गेजचा पाईप तुटल्याने कामात अडथळा निर्माण झाला. पाण्याचे फवारे आकाशात उंच उडाले आणि चाचणी थांबवावी लागली. या घटनेमुळे आता चार दिवसांनी पुन्हा टेस्टिंग घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) च्या सूत्रांकडून मिळाली. एमजेपीतर्फे नव्याने बसवलेल्या या मुख्य पाइपलाइनची हायड्रोलिक टेस्ट घेण्याची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती.
पाइपलाइनमध्ये पाणी भरून दाब (प्रेशर) वाढवण्याचे काम सुरू असताना, अचानक प्रेशर गेज जोडलेला पाइप तुटला. वाढत्या दाचामुळे पाण्याचा मारा झाल्याने कामगारांना तत्काळ मागे हटावे लागले आणि टेस्टिंग तातडीने थांबवण्यात आली. यानंतर तुटलेला पाइप दुरुस्त करण्यात आला असून, टँकरच्या माध्यमातून पुन्हा पाइपलाइन पाण्याने भरली जात आहे. संपूर्ण पाइपलाइनमधील हवा आणि पाण्याचे प्रमाण संतुलित करून पुढील तीन ते चार दिवसांत पुन्हा टेस्टिंग घेण्यात येणार असल्याचे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: ‘रामकाल पथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
नवीन डिसेंबर अखेरपर्यंत शहराला वाढीव २०० एमएलडी क पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, मुळात हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत गदेण्यात आली होती; मात्र यंत्रणांना तो कालावधी पाळता आला नाही, त्यामुळे आता डिसेंबरअखेरचे नवीन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ने महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार ने संस्थेने यासाठी कंबर कसली आहे. मुख्य पाइपलाइन, अंतर्गत नेटवर्क आणि जलकुंभबांधकामांची गती वाढवण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत
नक्षत्रवाडी एमबीआर ते शिवाजीनगरमार्गे केटली गार्डन जलकुंभापर्यंत टाकण्यात आलेली १४०० मिमी व्यासाची पाइपलाइन ही संपूर्ण नवीन पाणीपुरवठा योजनेचा मुख्य दुवा आहे. या पाइपलाइनद्वारे शहरातील दहा जलकुंभांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून पाणीपुरवठा सुरू झाल्यास शहरातील पाणीटंचाई कमी होणार असून, पूर्व भागासह मध्य आणि दक्षिण भागांनाही स्थिर पुरवठा मिळेल.
नक्षत्रवाडी एमबीआर ते केटली गार्डनपर्यंत १४०० मिमी व्यासाची मुख्य पाइपलाइन पूर्ण.
पाइपलाइनद्वारे १० जलकुंभांना पाणीपुरवठा होणार.
प्रेशर गेजचा पाईप तुटल्याने हायड्रोलिक टेस्टिंग थांबवावी लागली.
दुरुस्ती सुरू: पुढील चार दिवसांत पुन्हा टेस्टिंग नियोजित.
डिसेंबरअखेरपर्यंत २०० एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्धाचे लक्ष्य.