Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Deputy Chief Minister: अजितदादा 6व्यांदा उपमुख्यमंत्री; बारामतीत जाळ अन् धुर संगटच….

अजित पवार यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 05, 2024 | 08:06 PM
Ajit Pawar Deputy Chief Minister: अजितदादा 6व्यांदा उपमुख्यमंत्री; बारामतीत जाळ अन् धुर संगटच….
Follow Us
Close
Follow Us:
बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांचा शपथविधी समारंभ संपन्न होत असताना बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे व लाडू भरवत जल्लोष केला. विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रतीक्षेत असलेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदांचा शपथविधी समारंभ मोठ्या थाटात मुंबईमध्ये संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्यासाठी बारामती शहर व तालुक्यातील ५०० बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले होते.
बारामती शहरातील भिगवन चौक या ठिकाणी किरण इंगळे मित्र परिवाराच्या वतीने मोठी स्क्रीन लावून शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविण्याची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर देखील स्क्रीनची सोय करून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर शेवटी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा! अजितदादा!!, अशी घोषणाबाजी करत फटाके फोडले. त्यानंतर एकमेकांना पेढे व लाडू भरवून जल्लोष केला. बारामती शहरातील विविध ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. बारामतीच्या ग्रामीण भागातही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
Maharashtra CM Oath Ceremony: ‘मी देवेंद्र सविता गंगाधर फडणवीस…’; देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी आज (5 डिसेंबर)  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सहाव्यांदा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातही त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, ही त्यांची परंपरागत जागा आहे. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी तेवढे आमदार हवेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

 अजित पवारंनी केव्हा- केव्हा घेतली  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ?

2024- आज (5 डिसेंबर) सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

2023- अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते.

2022- याआधी, 30 डिसेंबर रोजी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते मुख्यमंत्री होते. 29 जून 2022 पर्यंत या पदावर राहिले.

2019- 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा चार दिवस मुख्यमंत्री असतानाही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

Eknath Shinde Oath Ceremony: शपथविधीत एकनाथ शिंदेंची नाराजी स्पष्ट; पण

2012- काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये अजित पवार यांना 2012 मध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले. सप्टेंबर २०१४ पर्यंत ते या पदावर होते.

2010- अजित पवार यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासोबतच यापूर्वी अर्थ मंत्रालय, महसूल, ऊर्जा, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि नियोजन खात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: Workers celebrate in baramati as ajitdada takes oath as deputy chief minister for the 6th time nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 08:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Deputy Chief Minister
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
2

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
3

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
4

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.