Photo Credit: Social media
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे उपनेते आणि या प्रकरणातील आरोपची वडील राजेश शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
वरळी हिट अँड रन प्रकरणात सरकारकडूनच आरोप मिहीर शाहाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण साधेसुधे नाही. राजेश शहा यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. आरोपी मिहीर शाहाचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे नेत आहेत. पोलिसांकडे रेकॉर्ड नसेल, तर आम्ही देतो. कुठल्या अंडरवर्ल्ड गँगरबरोबर त्यांचे संबंध आहेत. ते काय करतात, त्यांची संपत्ती, इतक्या महागड्या गाड्या कुठून आल्या, याचा हिशोब मुंबई पोलिसांना करावा लागले. असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.
“माझे मुंबई पोलिसांना आवाहन आहे की, राजेश शहा मुख्यमंत्र्यांचे खास माणूस कसे बनले. त्यांचा अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे. बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचे रेकॉर्ड चेक करा आणि ते समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कुठल्या पद्धतीची माणसे बसलीत हेही तुम्हाला समजेल” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
तसेच, “ अपघात झाला त्यावेळी मिहीर शहा ड्रग्सच्या नशेत होता. तो नशेत असल्याचे रेकॉर्डवर येऊ नये म्हणून तीन दिवस फरार करण्यात आले. नंतर त्याला अटक करण्यात आली त्यामुळे मुंबई पोलिसांवर सुद्धा यामुळे संशय वाढतो. एका निरपराध व्यक्तीला रस्त्यावर फेकून देणे, तिला वारंवार चिरडणे हा अत्यंत अमानुष प्रकार आहे. अशी व्यक्ती तुरुंगातून सुटू नये आणि त्याला कोणी सोडवायचा प्रयत्न करत असेल तर लोकांनीही त्याला पकडून जाब विचारला पाहिजे” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
याचवेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत होणाऱ्या क्रॉसवोटिंगवरही भाष्य केले. सत्ताधाऱ्यांनाच क्रॉस व्होटिंगची भिती वाट आहे. आम्हाला नाही. फडणवीसांनी यंत्रणेच्या बळावर घोडेबाजार केला. पण महाविकास आहाडीचे तीनही उमेदवार जिंकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.