Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडकरांनी निर्णयाचे स्वागत केले, यशवंत अन् लोकशाही आघाड्यांना बहुमत मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास

यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडी या दोन्ही आघाड्यांना प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2025 | 06:10 PM
कराडकरांनी निर्णयाचे स्वागत केले, यशवंत अन् लोकशाही आघाड्यांना बहुमत मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास

कराडकरांनी निर्णयाचे स्वागत केले, यशवंत अन् लोकशाही आघाड्यांना बहुमत मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • यशवंत व लोकशाही आघाड्यांना बहुमत मिळेल
  • कराडकरांनी आमच्या निर्णयाचे स्वागत केले
  • पालकमंत्री शंभूराज देसाईंचा विश्वास
कराड : कराड शहरातील प्रलंबित प्रश्नांची उकल करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कराडकरांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, दोन्ही आघाड्यांना प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कराड शहराचा विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे. यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. याप्रसंगी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, तसेच दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराला पाठिंबा

नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या रणजीत पाटील यांच्याबाबत बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते माघार घेतील, अशी अपेक्षा होती. मी आणि जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार सतत त्यांच्या संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मानणारे ते असल्याने पक्षाने त्यांना भरपूर सहकार्य दिले आहे. मात्र पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करूनही त्यांनी माघार घेतली नाही. याबाबतचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयाला पाठवण्यात येणार असून, त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील.

कराडच्या विकासासाठी हा निर्णय

शिवसेनेचे चिन्ह न वापरता स्थानिक आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला आहे. कराडच्या विकासासाठी स्थानिक आघाडीचा पर्याय निवडला असून, राजेंद्रसिंह यादव हे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. कराडच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर

शरद पवार गटाची मदत घेतल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ही कोणाची मदत नसून, कराडचा विकास साधण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. आम्ही विकास करू शकतो, या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच महायुतीतील मित्रपक्ष भाजपविरोधात आपण लढत आहात का?, असे विचारल्यावर पालकमंत्री म्हणाले, ही कोणाविरोधातील लढत नाही. कराड शहराचा विकास हा वन-लाईन अजेंडा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड शहराच्या विकासासाठी लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत आता एकत्रित आघाड्यांचा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जात असून, नागरिक त्यास उत्स्फूर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Yashwant vikas aghadi and lokshahi aghadi have decided to contest the elections together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Election News
  • Shambhraj Desai
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं आश्वासन, म्हणाले; निवडणुका संपताच…
1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं आश्वासन, म्हणाले; निवडणुका संपताच…

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
2

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार
3

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

राजकीय घडामोडींनी वातावरण तापले, राजगुरुनगरमध्ये चौरंगी लढत; कोणाला कौल मिळणार?
4

राजकीय घडामोडींनी वातावरण तापले, राजगुरुनगरमध्ये चौरंगी लढत; कोणाला कौल मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.