Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: ५५९ गावांना कृषी संजीवनीचा आधार! जलसंधारणापासून कृषिपूरक व्यवसायापर्यंत शेतकरींना अर्थसहाय्य

Yavatmal News: जिल्ह्यात पोकरा-२च्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसायांसाठी ६० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र गटांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2026 | 01:17 PM
Yavatmal ५५९ गावांना कृषी संजीवनीचा आधार! जलसंधारणापासून कृषिपूरक व्यवसायापर्यंत शेतकरींना अर्थसहाय्य

Yavatmal ५५९ गावांना कृषी संजीवनीचा आधार! जलसंधारणापासून कृषिपूरक व्यवसायापर्यंत शेतकरींना अर्थसहाय्य

Follow Us
Follow Us:

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात हवामान बदलाच्या वाढत्या संकटामुळे पावसाची अनिश्चितता, पावसातील खंड, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीसमोरील विविध जोखमींनी शेतकऱ्यांसमोर आव्हानांची मालिका उभी आहे. या पार्श्वभूमीवर शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामान बदलाला अनुकूल करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) टप्पा-२ला जिल्ह्यात गती मिळाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ५५९ गावांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून, पात्र अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच शेतकरी गटांना विविध घटकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: पोलिसांना सुसज्ज वसाहतींची प्रतीक्षा कायम! शासनाने मागवली निवासांची माहिती

ऑनलाइन प्रक्रियेला महत्त्व:

पोकरा २मध्ये ऑनलाइन प्रक्रियेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. महाडीबीटीऐवजी स्वतंत्र पोर्टलवर अर्ज व पुढील प्रक्रिया केली जात आहे. अर्जाची स्थिती, लाभार्थी यादी आणि आधारविषयक माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. लाभासाठी सातबारा, ८-अ, आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक असून, पूर्वसंमती, कामाची पाहणी आणि देयक प्रक्रिया हे महत्त्वाचे टप्पे आहेत. पोकराच्या माध्यमातून विविध घटकांना अर्थसहाय्य मिळत असले तरी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, लाभाची रक्कम वाढविणे, अनुदान वेळेत खात्यावर जमा करणे आणि गावपातळीवर जनजागृती वाढविण्याची मागणी आहे. डिजीटल प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

कृषी संलग्न व्यवसायांना ६० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य

जिल्ह्यात पोकरा-२च्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसायांसाठी ६० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र गटांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतात. शेतीपूरक व्यवसायांना आर्थिक पाठबळ मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होण्यास मदत होऊ शकते, हा या योजनेचा उद्देश आहे.

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

शेतीसोबत उत्पन्नाचे पर्यायी स्रोत

पोकरा-२चे वैशिष्ट्य केवळ एखाद्या कृषी निविष्ठेपुरते किया अनुदानापुरते मर्यादित नाही. पाणी, माती, पीक पद्धती आणि शेतकऱ्याचे उत्पन्न या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून शेती अधिक सक्षम करण्यावर या प्रकल्पातून भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेततळे, सिंचन सुविधा, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, शेतकरी गट, महिला बचत गट तसेच विविध कृषिपूरक व्यवसायांना या माध्यमातून चालना दिली जात आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीसोबत उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीनेही पोकरा-२ महत्त्वपूर्ण ठरत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal news krushi sanjivani supports 559 villages with financial aid for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • agricultural
  • farmer
  • yavatmal news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.