
पोलिसांना सुसज्ज वसाहतींची प्रतीक्षा कायम! शासनाने मागवली निवासांची माहिती; वणी, दिग्रससह ८ ठिकाणी ५२८ निवासांची नोंद
Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळताना दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांसाठी निवासाचा प्रश्न जिल्हयात वर्षानुवषे रेंगाळतांना दिसतो. राज्य शासनाकडून वेळोवेळी पोलिस क्वार्टर्ससाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करून नवीन पोलीस निवासस्थाने उभारण्यात आली असली, तरी जुन्या वसाहतींची सद्याची स्थिती राहण्यायोग्य नसतांनाही पोलिस आणि कुटुंबांना त्यात वास्तव्य करावे लागत आहे. यवतमाळ शहरात जुनी पोलिस वसाहतीमधील क्वाटर तर जीर्ण झाली आहे. मागील काही वर्षांपासून स्थानिक पोलिस प्रशासनाकडून जुन्या निवासांची डागडुजी करण्यात आली होती.(फोटो सौजन्य – AI)
विशेष म्हणजे पोलिस निवासस्थानांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ ही प्रमुख अंमलबजावणी संस्था आहे. प्रकल्पानुसार प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा, कार्यारंभ आदेश, बांधकाम, तपासणी आणि वापरकर्ता विभागाकडे हस्तांतरण अशी प्रक्रिया पार पडते. यवतमाळ शहरासह जिल्हयातील विविध पोलिस उपविभागात असलेल्या पोलिस क्वार्टरची दयनिय अवस्था पाहता नवीन इमारतींसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयाने १० जून २०२६ रोजी राज्यातील शासकीय पोलिस निवासस्थानांची अद्ययावत माहिती मागवली आहे. यावर पोलिस प्रशासनाकडुन माहिती अपडेट करत वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात आल्याची माहिती पोलिस खात्याकडुन देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, पुसद,उमरखेड, पांढरकवडा आणि वणी असे पोलिस उपविभाग असून, त्याअंतर्गत विविध पोलीस ठाणी कार्यरत आहेत. याशिवाय जिल्हा पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, वाहतूक शाखा, मोटार परिवहन विभाग आदी घटकही आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील पोलीस गृहनिर्माण प्रकल्प महत्त्वाचा ठरतो. येथे पोलीस ठाण्याच्या इमारतीसह ८६ पोलीस निवासस्थाने उभारण्यात आली. यामध्ये प्रकार-२ची ८० आणि प्रकार-३ची सहा निवासस्थाने आहेत. या प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ ८, २६५.२५ चौमी. आहे. या कामाचा वर्क ऑर्डर २९ जून २०१९ रोजी देण्यात आला होता. याची काम संपण्याची मुदत जून २०२१ होती. त्यानंतर मुदतवाढएमएसपीएचसीच्या जुन्या अधिकृत प्रकल्प यादीत यवतमाळसाठी ५०० पोलिस निवासस्थानांचा स्वतंत्र पोलीस क्वार्टर प्रकल्पाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. याच यादीत वणीच्या ७४ आणि दिग्रसच्या ८४ निवासस्थानांचाही समावेश आहे. मात्र या ५०० निवासस्थानांच्या प्रकल्पाची २०२६ मध्ये काही कामांचे प्रस्ताव मंजुर झाले तर पुर्वी मंजुर झालेल्या प्रस्तावानंतर निधीचे नियोजन करुन कामे सुरू आहे.
यवतमाळ शहरातील पळसवाडी पोलीस वसाहतीच्या विस्तारासाठी २ कोटी ४९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. याच पॅकेजमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विस्तारासाठी ५ कोटी आणि यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या तिन्ही कामांसाठी एकूण १२ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.