Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अवघ्या चार महिन्यांत 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, कर्जबाजारीपणा ठरलं कारण

यवतमाळ जिल्हा हा कोरडवाहू कापूस पट्टा असून येथे शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. सिंचन सुविधांची तीव्र कमतरता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2026 | 08:12 AM
अवघ्या चार महिन्यात १०२ शेतकरी आत्महत्या

अवघ्या चार महिन्यात १०२ शेतकरी आत्महत्या

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच विविध आर्थिक व सामाजिक कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 102 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांत या आत्महत्यांच्या घटना घडल्या असून, विशेषतः अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

बँका तसेच खासगी सावकारांचे वाढते कर्ज, परतफेडीचा दबाव आणि सततचा मानसिक ताण यामुळे शेतकरी अधिकच हतबल झाले आहेत. यवतमाळ जिल्हा हा कोरडवाहू कापूस पट्टा असून येथे शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. सिंचन सुविधांची तीव्र कमतरता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी व मागासवर्गीय शेतकरी वास्तव्यास असून, ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. कर्ज उपलब्धतेत अडचणी, महागडी बियाणे व तंत्रज्ञान, पीक निवडीवरील मर्यादा तसेच पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी न होणे यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा सातत्याने वाढत आहे.

शासकीय योजनांचे अपयश

सरकारकडून विविध योजना जाहीर होत असल्या तरी त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. धोरणे व अंमलबजावणी यामधील मोठी दरी शेतकऱ्यांच्या संकटाला कारणीभूत ठरत आहे. कर्ज व्यवस्था कोलमडलेली आहे, पिक विविधीकरणाला प्रोत्साहन नाही, बियाणे महागडी व अनियंत्रित आहेत आणि पीकविमा योजनाही अविश्वसनीय ठरत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण.

शासनाविरोधातील तीव्र असंतोष

१०२ शेतकरी आत्महत्या हा केवळ आकडा नसून शासनाविरोधातील तीव्र असंतोषाचा इशारा आहे. आता केवळ आश्वासने नव्हे तर तातडीची कृती आवश्यक आहे, अन्यथा यवतमाळपासून सुरू होणारे आंदोलन संपूर्ण विदर्भात तीव्र होईल, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिला आहे.

७४२ रुपये प्रीमियम भरूनही विम्याचे मिळाले अवघे १८३ रुपये

येवला शासनाकडून पिकांचे ५० टक्के नुकसान गृहीत धरून मदत जाहीर केली जात असताना, पीक विमा कंपन्यांनी नुकसानीची टक्केवारी अत्यल्प दाखवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. तालुक्यातील साताळी येथील एका शेतकऱ्याला मका आणि सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याच्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई मिळाल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nashik News : शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा ! ७४२ रुपये प्रीमियम भरला अन् विम्याच्या नावाखाली मिळाले अवघे १८३ रुपये

Web Title: 102 farmers committed suicide in just four months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Farmer Issue
  • Natural calamities

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.