
Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! (फोटो- सोशलमीडिया)
सदर योजनेचा उद्भव तापी नदीकाठी शेळगाव बॅरेज येथे टाकरखेडा गावाजवळ घेण्यात आला आहे. तेथे पाच मीटर व्यासाचे एक इंटेक वेल, दोन इन्स्पेक्शन वेल व आठ मीटर व्यासाचे जॅकवेल, २०० मीटर अप्रोच बंड तसेच ६०० मीटरचा अप्रोच रोड घेण्यात येणार आहे.
नदीचे पाणी इंटेक वेलच्या माध्यमातून जॅकवेल मध्ये टाकण्यासाठी ६०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन करण्यात येत आहे. अप्रोच बंडचे काम पूर्ण झाले असून जॅकवेल व इंटेक वेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जॅकवेलचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पाठवण्यासाठी २५० एचपीचा पंप व विजेचा खर्च वाचवण्यासाठी १९० केव्हीचा सोलर प्लांट बसवण्यात येत आहे.
जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र ४०० मि.मी. व्यासाची ८ किमी पाईपलाईनपैकी ४.१० किमी काम पूर्ण झाले आहे. योजनेत ११ दशलक्ष लिटर क्षमतेचा आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, प्री-सेटलिंग टैंक, फिल्टर बेड साफ करण्याची यंत्रणा, पाण्याचा पुनर्वापर, ६० एचपीने २२ लक्ष लिटरच्या साने गुरुजी जलकुंभात व ५० एचपीने १० लक्ष लिटरच्या श्रीराम नगर जलकुंभात पाणी, तसेच केंद्रावर १२० केव्हीचा सोलर प्लांट आहे. केंद्राचे ४५ टक्के काम व ५७ किमी वितरण वाहिनीपैकी २१ किमी काम पूर्ण झाले आहे. अशी माहिती नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी दिली.
Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या …
सन २०२१ साली २०५६ ची लोकसंख्या गृहीत धरून दरडोई १३५ लिटर पाणी मिळालं पाहिजे या भूमिकेतून आम्ही हे स्वप्न पाहिलं होतं आणि हे स्वप्न आजा पूर्ण होताना दिसतंय. ५० टक्के काम पूर्ण झालं आहे. जॅकवेल पासून फिल्टरपर्यंत ४०० मि.मी. व ६०० मि.मी. डीआय पाईपलाईनचे काम सुरू आहे. योजना ५६ कोटीची आहे, पण आतापर्यंत फक्त साडेसात कोटी मिळाले आहेत. निधी करून ५० टक्के काम केले आहे.
पूर्वी पारंपरिक फिल्टर होते, गाळ Manually काढावा लागत होता, पण आता नवीन न केंद्रात Mechanisum पद्धतीने गाळ काढला जाणार आहे. २०२१ मध्ये न पाहिलेले स्वप्न उशिरा का होईना पूर्ण होत न आहे. मला खात्री आहे की पुढच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये या नवीन शेळगाव न योजनेवरून शहराला पाणी देऊ शकू, असे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी सांगितले.
Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)
“66 योजनेसंदर्भात स्थितीत सध्या प्रशासनाकडून योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत काम लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. थौडा रस्त्याची अडचण होती तर ती लवकरच प्रयत्न करून सोडविली जाईल.”
अनुराधा पाटील, अभियंता
सदर नगराध्यक्षा छाया पाटील पाहणी करत असताना त्यांच्या सोबत नगरसेवक अतुल पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, दादू धोत्रे, पीएमसीचे जैन, सुमित, यांच्यासह नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, उमर कच्ची, करीम मन्यार, शिवसेना तालुकाप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, योगेश पाटील, पप्पू जोशी, फारूक हाजी, नरेंद्र शिंदे, भूषण खैरे, किशोर माळी व पत्रकार बंधू उपस्थित होते.