संधी सुदैवाने मिळते, मिळालेल्या संधीतून उत्तमोत्तम कार्य करावं; आमदार प्रशांत ठाकूरांचं वक्तव्य
राजकीय स्पर्धा प्रचंड आहे. संधी सुदैवाने मिळते. त्यामुळेच मिळेल त्या संधीतून उत्तमोत्तम कार्य करावं, असं वक्तव्य पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं आहे. ते आयेजित पत्रकार संवाद सभेत बोलत होते. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत अशा मुद्द्यांचा समावेश होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना निसर्ग, पर्यावरण, पर्यटन विकास याबद्दल देखील माहिती दिली. यादरम्यान, नव्याने आमदारकीसाठी सज्ज होणाऱ्या प्रशांत ठाकूर यांना उपस्थित सगळ्या पत्रकारांनी सदिच्छा दिल्या आहेत.
हेदेखील वाचा- घाटकोपरमध्ये कॅब ड्रायव्हरची ऑडी कारला धडक; कार मालकाला राग अनावर, कॅब ड्रायव्हरला मारहाण
रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळ सभागृहात ही पत्रकार संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांसोबत राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत अशा सगळ्या प्रश्नांवर सांगोपांग चर्चा केली. पत्रकार संवाद सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की, राजकारणात प्रचंड स्पर्धा आहे. इच्छा सगळ्यांच्या असतात की संधी आपल्यालाच मिळावी. पण सगळ्या आमदारांना मंत्रिपद देता येणार नाही. त्यामुळे जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीतून उत्तमोत्तम कार्य केलं पाहिजे. मला सिडकोचे अध्यक्षपद मिळाले तेव्हा पण इतर किमान दहाजण या पदासाठी इच्छुक होते. संधी सुदैवाने मिळते. त्या संधीसाठी कार्यामध्ये सातत्य असावे लागते.
हेदेखील वाचा- रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला देणार भेट; पुतळा कोसळलेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार
मूळचे पत्रकार व भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह विविध पत्रकार संघांचे पदाधिकारी व्यासपीठावर व सभागृहात होते. प्रशांत ठाकूर यांनी तीन टर्म पनवेलची आमदारकी भूषवली आहे. नव्याने येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत ते आज देखील प्रबळ आहेत. पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी पनवेलच्या महानगर विकासासह तालुक्यातील निसर्ग, पर्यावरण, पर्यटन विकास याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केले. यासह या सभेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांसोबत राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत अशा सगळ्या प्रश्नांवर सांगोपांग चर्चा केली. नव्याने आमदारकीसाठी सज्ज होणाऱ्या प्रशांत ठाकूर यांना उपस्थित सगळ्या पत्रकारांनी सदिच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. तसेच यावेळी मॅरेथॉन स्पर्धेच्या वेबसाईट पेडचं प्रकाशन देखील पार पडलं आहे. यासोबतच रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरु झाली आहे. प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की, या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार. खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे.