घाटकोपरमध्ये कॅब ड्रायव्हरची ऑडी कारला धडक; कार मालकाला राग अनावर, कॅब ड्रायव्हरला मारहाण (फोटो सौजन्य- X)
मुंबईत एका ओला कॅब ड्रायव्हरला ऑडी कारच्या मालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत ओला कॅब ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडी कार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कयामुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (वय २४) असं मारहाण करण्यात आलेल्या ओला कॅब ड्रायव्हरचं नाव आहे. तर ऋषभ चक्रवर्ती असं कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या ऑडी कार मालकाचं नाव आहे.
हेदेखील वाचा- रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला देणार भेट; पुतळा कोसळलेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर परिसरात ओला कॅब ड्रायव्हर आणि ऑडी कारची धडक झाली. कॅब ड्रायव्हरने ऑडी कारला पाठीमागून धडक दिली. गाडीला धडक होताच ऑडी कार मालक गाडीतून उतरला आणि त्याने कॅब ड्रायव्हरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाली आणि वाद वाढत गेला. याच रागातून ऑडी कार मालकाने ओला कॅब ड्रायव्हरला मारहाण केली. य घटनेत ओला कॅब ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 18 ऑगस्ट रोजी रात्री 11.20 च्या सुमारास ओला कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी प्रवाशासह नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी ऑडी कार मालकाच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. असल्फा मेट्रो स्थानकावरून जात असताना ही घटना घडली. कॅब ड्रायव्हरची समोरच्या ऑडी कारला धडक बसली. या घटनेत आपल्या कारचे काही नुकसान झालं आहे का, हे पाहण्यासाठी कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी गाडीतून खाली उतरला. यावेळी ऑडी कार मालकाने त्याला मारहाण केली.
हेदेखील वाचा- कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ
ऑडी कारमधील ऋषभ चक्रवर्ती (३५) आणि त्याची पत्नी अंतरा घोष (२७) हे जोडपे खाली उतरले आणि कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी यांना शिवीगाळ करू लागले. यानंतर ऋषभ चक्रवर्ती यांनी कॅब चालक कयामुद्दीन अन्सारी यांना मारहाण केली. या घटनेत अन्सारी यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे परिसरातील लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अन्सारी यांना प्रथम घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर शासकीय जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अन्सारीचा जबाब नोंदवण्यात आला असून, इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे रेकॉर्डिंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऋषभ चक्रवर्ती आणि अंतरा घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.