Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या 'शिवराज अष्टक'मधील आगामी चित्रपटाबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये नवाकोरा चेहरा शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 05, 2026 | 01:44 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटाचे ग्रँड इव्हेंट
  • कलाकारांची लागली उपस्थिती
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

नुकताच पुणे येथे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटाचे ग्रँड इव्हेंट मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ मध्ये शिवरायांची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. आणि अखेर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या ‘शिवराज अष्टक’ या ८ चित्रपटांच्या प्रोजेक्टमधील ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या सहाव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर उघड झालं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आयोजित एका सोहळ्यात भरजरी वस्त्र, आकर्षक जिरेटोप, आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार अशा रुबाबात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले. या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले, या कार्यक्रमातच शिवछत्रपतींच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला.

 

या कार्यक्रमात भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ हे सगळंच अगदी भारावून टाकणारं होतं. तसेच ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाच्या सादरीकरण भारावून टाकणारे होते. शिवछत्रपतींच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक होते. तर या सिनेमात छत्रपती शिवरायांच्या रूपात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे. तसेच त्याला पाहून त्याचे चाहते देखील खूप खुश झाले. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड

या कार्यक्रमात ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती ज्यामध्ये, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, निखिल राऊत, नूपुर दैठणकर यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. तसेच या चित्रपट महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. आणि त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक पाहायला मिळणार आहे.

दरम्यान शिवराज अष्टकातील आतापर्यंतच्या पाच चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने शिवछत्रपतींची भूमिका साकारली होती. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ या सिनेमांमध्ये तो शिवछत्रपतींच्या भूमिकेत झळकला होता. परंतु आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.

 

 

Web Title: Digpal lanjekar movie ranapati shivray swari agra actor abhijeet shwetchandra as chhatrapati shivaji maharaj replaced chinmay mandlekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!
1

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

वाढदिवसाच्या दिवशी Deepika Padukone ने चाहत्यांना दिले सरप्राईज,  नव्या पिढीसाठी उचललं मोठं पाऊल
2

वाढदिवसाच्या दिवशी Deepika Padukone ने चाहत्यांना दिले सरप्राईज, नव्या पिढीसाठी उचललं मोठं पाऊल

Deepika Padukone Birthday: दीपिकाने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, गायले ओम शांती ओम गाणे; पाहा VIDEO
3

Deepika Padukone Birthday: दीपिकाने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, गायले ओम शांती ओम गाणे; पाहा VIDEO

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर
4

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.