Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा

आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कराडमध्ये युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचे दाखवत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 04:57 PM
Youth Congress protest agnst Sanjay Gaikwad

Youth Congress protest agnst Sanjay Gaikwad

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या वक्तव्यावरून युवक काँग्रेस आक्रमक
  • कराडमध्ये संजय गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे लचके
  • २४ तासांत शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी
 

सातारा : शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह, हीन वक्तव्य केल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. कराड येथे युवक काँग्रेसच्यावतीने आमदार गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्यावर टाकण्यात आला. त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी या प्रतिकात्मक पुतळ्याचे लचके तोडल्याचे दाखवत युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना आता अशाच पद्धतीने जाब विचारला जाईल,” असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या अपमानावरून युवक काँग्रेस आक्रमक

यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे महेश करचे म्हणाले की, महाराष्ट्राचा शेतकरी दिवस-रात्र कष्ट करून देशाचे पोट भरतो. मात्र, त्याच शेतकऱ्यांबद्दल हीन, असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आधीच त्रस्त असताना त्यांच्या दुःखाची चेष्टा करणे अत्यंत संतापजनक आहे.

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

“महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांनी येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा युवक काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन करेल. शेतकऱ्यांबद्दल हीन वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना यापुढे रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल,” असा इशारा करचे यांनी दिला.

माफी नाही तर आणखी तीव्र आंदोलन

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. “माफी मागितली नाही तर आमदारांच्या अंगावर भटकी कुत्री सोडून, तोंडाला काळे फासून तीव्र निषेध व्यक्त करण्यास युवक काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही,”

दरम्यान, या आंदोलनात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, एनएसयूआय अध्यक्ष मुबीन बागवान, माण तालुकाध्यक्ष महेश करचे, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष चैतन्य पाटील, जितू यादव, तालुकाध्यक्ष देवदास माने, दिग्विजय जमाले, समीर इनामदार युवक काँग्रेसचे पदाधिकारी, व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही नेत्याला यापुढे माफ केले जाणार नाही, असा निर्धार युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय गायकवाड यांच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन कुठे केले?

    Ans: सातारा जिल्ह्यातील कराड येथे युवक काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केले.

  • Que: आंदोलनादरम्यान नेमकं काय करण्यात आलं?

    Ans: आमदार संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्यावर ठेवण्यात आला. भटक्या कुत्र्यांनी पुतळ्याचे लचके तोडल्याचे दाखवत कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

  • Que: युवक काँग्रेसने संजय गायकवाड यांना काय इशारा दिला?

    Ans: येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला.

Web Title: Youth congress protest sanjay gaikwad farmers remark karad satara vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Sanjay Gaikwad
  • Satara News
  • youth congress

संबंधित बातम्या

Satara Politics:पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेणार : हर्षदा देशमुख
1

Satara Politics:पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेणार : हर्षदा देशमुख

Satara Municipal Council Dispute: सातारा पालिकेत विकासकामांच्या निधीवरून वाद!; बाकड्यांवरून नगरसेवकांमध्ये जुंपली
2

Satara Municipal Council Dispute: सातारा पालिकेत विकासकामांच्या निधीवरून वाद!; बाकड्यांवरून नगरसेवकांमध्ये जुंपली

कराड उत्तरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊस वाहतूकच रोखली, 3 किलोमीटरपर्यंत रांगा
3

कराड उत्तरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊस वाहतूकच रोखली, 3 किलोमीटरपर्यंत रांगा

Sanjay Gaikwad Controversial Statement: शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य भोवणार; संजय गायकवाडांवर निलंबनाची टांगती तलवार
4

Sanjay Gaikwad Controversial Statement: शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य भोवणार; संजय गायकवाडांवर निलंबनाची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.