Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Municipal Council Dispute: सातारा पालिकेत विकासकामांच्या निधीवरून वाद!; बाकड्यांवरून नगरसेवकांमध्ये जुंपली

Satara Municipal Council Dispute: या कामासाठी कोणत्या प्रभागाचा विकासनिधी वापरण्यात आला, नगरपरिषदेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती का आणि मद्यविक्री दुकानासमोरच बाकडी बसवण्यामागील कारण काय, याची माहिती त्यांनी मागितली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 31, 2026 | 12:15 PM
Satara News, Civic News, Local Governance, Municipal Council,

Satara News, Civic News, Local Governance, Municipal Council,

Follow Us
Follow Us:
  • सातारा नगरपरिषदेत नगरसेवकांमध्ये मतभेद
  • मद्यविक्री दुकानासमोरच बाकडी बसवण्यामागील कारण काय
  • महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Satara Municipal Council Dispute: सातारा नगरपरिषदेतील विकासकामांच्या नियोजनावरून नगरसेवकांमध्ये मतभेद असल्याचे बाकड्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ८ साठी मंजूर करण्यात आलेली बाकडी प्रभाग क्रमांक ९ मध्ये बसवण्यात आल्याच्या वृत्तानंतर प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक फिरोज पठाण यांनी या प्रकाराबाबत आक्षेप नोंदवला आहे. या कामाच्या मंजुरीपासून निधीच्या वापरापर्यंतची माहिती स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नगरपरिषदेच्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदाची घोषणा झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पठाण यांनी हा विषय उपस्थित केला. मंजूर विकासकामांची अंमलबजावणी संबंधित प्रभागातच झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. एका प्रभागासाठी मंजूर केलेली बाकडी दुसऱ्या प्रभागात बसवण्याचा निर्णय कोणत्या प्रक्रियेनुसार घेण्यात आला, असा त्यांचा सवाल आहे.

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा

या कामासाठी कोणत्या प्रभागाचा विकासनिधी वापरण्यात आला, नगरपरिषदेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती का आणि मद्यविक्री दुकानासमोरच बाकडी बसवण्यामागील कारण काय, याची माहिती त्यांनी मागितली आहे. संबंधित ठिकाणी महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला होता का, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या प्रकरणाची सविस्तर माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे मागणार असल्याचे पठाण यांनी सांगितले. दरम्यान, या बाकड्यांच्या स्थलांतराबाबत संबंधित नगरसेवकांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा निर्णय कोणत्या कारणाने आणि कोणाच्या संमतीने घेण्यात आला, हे प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होणार आहे.

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

विकासकामांच्या अधिकारांचा प्रश्न

नगरपरिषदेत प्रभागनिहाय विकासकामांचे नियोजन, निधीचा विनियोग आणि कामांच्या अंमलबजावणीतील अधिकार याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. बाकड्यांच्या प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपची सत्ता असलेल्या सातारा पालिकेत दोन्ही राजांच्या मनोमिलनानंतरही स्थानिक पातळीवर नगरसेवकांमध्ये समन्वयाची गरज असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. प्रशासन या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा नगरपरिषदेत बाकड्यांच्या स्थलांतरावरून कोणता वाद निर्माण झाला आहे?

    Ans: प्रभाग क्रमांक ८ साठी मंजूर करण्यात आलेली विकासकामांची बाकडी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मद्यविक्री दुकानासमोर बसवल्याने नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

  • Que: या प्रकरणावर नगरसेवक फिरोज पठाण यांनी कोणते आक्षेप घेतले आहेत?

    Ans: एका प्रभागाचा निधी दुसऱ्या प्रभागात वापरण्यासाठी प्रशासकीय मान्यता होती का, आणि दारूच्या दुकानासमोर बाकडी बसवताना महिलांच्या सुरक्षेचा विचार केला होता का, असे सवाल पठाण यांनी उपस्थित केले आहेत.

  • Que: या प्रकरणाची माहिती कोणाकडे मागण्यात येणार आहे?

    Ans: या प्रकरणाबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे सविस्तर माहिती मागण्यात येणार आहे.

Web Title: Satara municipal council ward dispute benches relocation firoz pathan as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Satara Municipal Council
  • Satara News

संबंधित बातम्या

कराड उत्तरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊस वाहतूकच रोखली, 3 किलोमीटरपर्यंत रांगा
1

कराड उत्तरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊस वाहतूकच रोखली, 3 किलोमीटरपर्यंत रांगा

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे
2

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

जिल्हा बँकेच्या आखाड्यात रामराजे-जयकुमार एकाच मंचावर; कट्टर विरोधकांच्या दिलखुलास गप्पांनी राजकीय वर्तुळात खळबळ
3

जिल्हा बँकेच्या आखाड्यात रामराजे-जयकुमार एकाच मंचावर; कट्टर विरोधकांच्या दिलखुलास गप्पांनी राजकीय वर्तुळात खळबळ

Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण
4

Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.