
Sanjay Gaikwad, Eknath Shinde, Shiv Sena, Farmers Crisis, Agriculture News, Maharashtra Politics,
MLA Sanjay Gaikwad Controversial Statement: बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच संतापले असून आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेही चांगलेच संतापले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांसाठी शिलाई मशीन, शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सायकलींचे वाटप केले जाते. शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्याचे १०० ट्रकही मदतीसाठी पाठवण्यात आल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. पण संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना, नेते आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा
शेतकरी आपले अन्नदाता असून त्यांच्याविरोधातील कोणतीही अवमानकारक विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी इशारा देत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांचे शिवसेनेतून निलंबन करण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) शेतकऱ्यांच्या आत्मह्त्यांबाबत बोलतना म्हणाले होते की, ” शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदारांना पत्र पाठवावे, आम्ही सर्वजण मिळून त्याला मदत करू. मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो, शेतकरी कुठलाही विचार न करता आत्महत्या करतात, जर कोणत्याही शेतकऱ्याने जीव दिला तर त्याच्या मयतीलाही कुणी जाऊ नये, कोणी नाही गेले म्हणजे त्यांना कळेल की आपली बॉडी जनावरे खातील मग तो जीव देणार नाही.”
विधान परिषद निवडणुकीत पवारांची दिसून आली ‘पॉवर’; पक्षाचा स्ट्राईक रेट 100 टक्के
संजय गायकवाडांच्या या वक्तव्यामुळे वाद वाढताच आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना ते शेतकऱ्यांसाठी नसून अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या संदर्भात असल्याचा दावा केला. पण त्यानंतरही त्यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातूनही प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात आणि संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Ans: शेतकरी आत्महत्येबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय गायकवाड यांच्यावर शिवसेनेतून निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: शिवसेना पक्ष राज्यभरात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धान्य, सायकली आणि शिवणकाम मशिन्स वाटप करून मदत करत असल्याचा दावा करत आहे.
Ans: नाही, निलंबनाच्या कारवाईबाबत अद्याप पक्षाकडून अधिकृत पत्रकार परिषद किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.