Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yugendra Pawar: “साहेबांच्या विचारांसाठी गद्दारी विरोधात…” बारामतीमधून युगेंद्र पवार यांचे विधान

महाराष्ट्रात निवडणुकी अगोदरचे कल हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. पण हे निकाल अनपेक्षित आहेत. या निवडणुकीत बरेच दिगज्ज नेते पराभूत झाले,असे युगेंद्र पवार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 01, 2024 | 06:10 PM
Yugendra Pawar: "साहेबांच्या विचारांसाठी गद्दारी विरोधात..." बारामतीमधून युगेंद्र पवार यांचे विधान

Yugendra Pawar: "साहेबांच्या विचारांसाठी गद्दारी विरोधात..." बारामतीमधून युगेंद्र पवार यांचे विधान

Follow Us
Close
Follow Us:

डोर्लेवाडी:  पवार साहेबांच्या विचारांसाठी गद्दारी विरोधात लढलो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. राज्याच्या विधानसभा निवडणुक निकालानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केला आहे. झारगडवाडी (ता. बारामती) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड लढाई बारामतीची होती. तरीही आपण साहेबांच्या विचारांसाठी गद्दारी विरोधात लढलो. आपले प्रतिस्पर्धी राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण आपण गद्दारी विरोधात लढलो नाही; तर महाराष्ट्र बरबाद होईल. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
महाराष्ट्रात निवडणुकी अगोदरचे कल हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते; पण हे निकाल अनपेक्षित आहेत. या निवडणुकीत बरेच दिगज्ज नेते पराभूत झाले. याआधी बारामतीत इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. आपण पहिलीच निवडणूक लढवून आपल्याला ८० हजार पेक्षा जास्त मतदारांनी स्वीकारले; हाच आपला विजय आहे. निवडणुकीत जय पराजय होत असतो; पण आपण स्वाभिमान सोडणार नाही. येणाऱ्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वाभिमानी मतदारांच्या विश्वासावर पूर्ण ताकतीने लढू आणि जिंकू.
सत्ताधाऱ्यांसाठीही निवडणुकीचा हा निकाल अनपेक्षितच आहे. ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त झाला नसता तर त्यांनी महाराष्ट्रभर जल्लोष केला असता. लाडक्या बहिणींचे मतदानही निर्णायक होते पण भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गावगाड्यातील मलिदा पुढारीच पुन्हा नेतृत्व करताना दिसतील, हे चित्र बदलायचं आहे. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सतीश खोमणे, एस. एन. जगताप, राजेंद्र जगताप, प्रशांत बोरकर, गावचे माजी सरपंच लालासाहेब कालगावकर, आप्पासो साळुंखे यांचे सह गावातील सर्वच बूथ कमिटी सदस्य आणि निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अस्तित्व टिकवायचे आहे. तेथील जवळपास तीन हजार बोगस सभासदां विरोधात कोर्टात केस चालू आहे. येणाऱ्या निवडणुकीत बोगस मतदारांचे आवाहन रोखायचे आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर असली तरी, एक एक मत महत्त्वाचे आहे. सत्ताधारी लोकशाहीचा गळा घोटून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतील पण सभासदांनी योग्य निर्णय घ्यायचा आहे.

अजित पवार- 
युगेंद्र हा व्यावसायिक असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. लोकसभेला माझी चूक झाली, हे मी सर्वांना सांगून दमलो. तरीही माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभं करायचं काहीच कारण नव्हतं. माझी चूक झाली, म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा पाया रचण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले, यामुळे महाराष्ट्र कदापि त्यांना विसरणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाण्याचे काम चालू ठेवणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांने आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Web Title: Yugendra pawar statement on baramati assembly election ajit pawar sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 06:10 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Maharashtra Assembly election 2024
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
3

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा
4

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.