Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर? अजित पवार गड राखणार की युगेंद्र पवार परिवर्तन करणार? जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मोठी ताकद पणाला लावल्याने मतदानाची आकडेवारी वाढल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2024 | 02:35 AM
बारामतीत वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर? अजित पवार गड राखणार की युगेंद्र पवार परिवर्तन करणार? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे:  बारामती विधानसभा मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेत ७२.२७ टक्के मतदान झाले.वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार? ,उपमुख्यमंत्री अजित पवार आपला अभेद्य गड राखणार की युगेंद्र पवार परिवर्तन करणार याबाबत बारामतीत विविध तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मैदानात उतरवल्याने ही लढत मोठी रंगतदार ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मोठी ताकद पणाला लावल्याने मतदानाची आकडेवारी वाढल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (दि २०) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये बारामती शहरासह तालुक्यात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ लाख ८०,६०८ एकूण मतदार असून यामध्ये पुरुष मतदार १,९२,८१९ तर स्त्री मतदार १,८७,७६५ आहेत, तर तृतीयपंथी २४ मतदार आहेत. या मतदारसंघातील १,४२,६९६ पुरुष मतदारांनी तर १,२८,४६२ स्री मतदारांनी व ११ तृतीयपंथी मतदारांनी असे  एकुण २,७१,२६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार, याबाबत बारामतीकारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मते वाढलेल्या मतदानाचा फायदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच होणार असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांना आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बारामती मध्ये परिवर्तन अटळ असून युगेंद्र पवार बारामतीचे नवे आमदार होतील, असा दावा करत आहेत.

हेही वाचा: एक्झिट पोलनुसार महायुती, ‘मविआ’त कांटे की टक्कर; सत्तास्थापनेत राज ठाकरे किंगमेकर ठरणार? पहा आतली बातमी

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार तसेच त्यांचे दोन्ही चिरंजीव त्याचबरोबर त्यांच्या बहिणी देखील प्रचार यंत्रणेत सक्रिय होते. त्यांनी देखील लोकसभेतील झालेल्या चुका टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीका त्यांनी केली नाही. तशा सूचना देखील त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. “लोकसभेला सुप्रियाताई व विधानसभेला अजितदादा,”असेच जनतेने ठरवले असल्याचा उल्लेख अनेक सभांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी केला. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ जिरायती भागात घेतलेल्या सभा , तसेच शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील मतदारांशी भेटीगाठी घेतल्या.

खासदार सुप्रिया सुळे यादेखील मतदानाच्या आदल्या दिवशी देखील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होत्या, त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेकांच्या मते उपमुख्यमंत्री पवार यांनी बदललेल्या रणनीतीमुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, मात्र युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे असलेली शरद पवारांची ताकद अजित पवार आव्हानात्मक आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेला झालेली जनतेची अलोट गर्दी यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती अजित पवार यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरली. या सभेमुळे अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Devendra Fadanvis: राज्यात मतदानाचा टक्का वाढला; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या-ज्या वेळेस…”

दरम्यान योगद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार व आई शर्मिला पवार यांनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर सुरक्षारक्षकाने अर्धा तास अडविल्याचा व्हिडिओ चांगला चर्चेत आला. अजित पवार यांनी आपल्या भाषणात प्रतिभा काकी माझ्या आईसमान असून सदर गेट हे लोडिंग लोडिंग साठी होते, असे स्पष्टीकरण दिले. मात्र या व्हायरल व्हिडिओ मुळे बारामती मध्ये चांगलेच वातावरण तापले. मतदानादिवशी बारामती शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेच्या मतदान केंद्रात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा कथित वादही माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत आला. एकंदरीत या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास अनेक राजकीय तज्ञ व्यक्त करत असले तरी युगेंद्र पवार यांच्या मागे असणारी शरद पवारांची ताकद कितपत युगेंद्र यांना फायद्याची ठरणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Yugendra pawar v ajit pawar fight in baramati constituency for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध
2

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
3

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
4

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.