Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषदेनं पुकारलं अलर्ट; आराेग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सीईओंच्या सक्त सूचना

राज्यात मुंबई शहर तसेच काही जिल्हयामध्ये गोवरचा विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेनं अलर्ट पुकारले असून, आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2022 | 08:29 PM
जिल्हा परिषदेनं पुकारलं अलर्ट; आराेग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सीईओंच्या सक्त सूचना
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : राज्यात मुंबई शहर तसेच काही जिल्हयामध्ये गोवरचा विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेनं अलर्ट पुकारले असून, आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. गोवर रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, व जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली आहे.

शुक्रवारी जिल्हा कृतिदल आढावा बैठकीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अतिरिक्त् जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, डॉ. अनिरुध्द पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुचना केल्या आहेत की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे व घाबरुन न जाता गोवर टाळण्यासाठी गोवर लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे. तसेच जिल्हयातील उसतोड मजूर, वीटभटृटी कामगार, वाडया-वस्तया, इ. ठिकाणी अतिजोखमीच्या गावांतील भागांचे संशयित रुग्णाचे शोध घेणे, जागतिक आरोग्य संघटना यांच्या माहितीन्वये गोवर हा हवेच्या माध्यमातून पसरतो, खोकल्याद्वारे हवेमार्फत याचा प्रसार होतो. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते सुरुवातीस ताप व खोकला त्यानंतर सर्दी, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येतात आणि ते कानाच्या मागे, चेहरा, छाती पोटावर पसरतात.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत वारंवार आढावा घेतला आहे. तसेच ते पाठपुरावा देखील करत आहेत. काही तालुक्यांचे रिपोर्टिंग प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ रिपोर्टिंग अद्ययावत करणेची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत तालुका अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.

काय काळजी घ्यावी?

१. बालकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अ जीवनसत्व द्यावे.

२. बालकांचे नियमित लसीकरण करावे.

३. गोवर संशयित रुग्णांच्या संपर्कात जाणे टाळावे. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

४. पिवळी फळे, हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक, वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो.

१. सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायकि यांनी संशयित गोवर रुग्ण आढळून आल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.

२. गोवर पहिला डोस व दुसरा डोस प्रलंबित असलेल्या बालकांची यादी तयार करुन अतिरिक्त लसीकरण सत्र ठेवून पूर्ण करुन ती माहिती पोर्टलला अद्ययावत करावी.

३. शिक्षण व बालकल्याण या विभागाची मदत घेण्यात यावी. याबाबत सायंकाळी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे आरोग्य तसेच BEO व CDPO यांना संबोधित करण्यात येणार आहे.

४. गोवर विषाणूजन्य आजाराबाबत जन- जागरण, प्रशिक्षण, या गोष्टींवर भर देणे व ग्रामीण भागातील सर्व जनतेला आवाहन केले आहे कि. गोवर विषाणूजन्य आजाराला घाबरुन न जाता, वरील जागतिक आरोग्य
संघटनेच्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Zilla parishad called alert ceos strongly advise health department to be vigilant nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 08:29 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Dilip Swami
  • Eknath Shinde
  • Zp Solapur

संबंधित बातम्या

Nashik Politics: नाशिकचं राजकारण तापणार; भाजपचे मिशन १०० प्लस तर एकनाथ शिंदे स्वबळावर
1

Nashik Politics: नाशिकचं राजकारण तापणार; भाजपचे मिशन १०० प्लस तर एकनाथ शिंदे स्वबळावर

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
2

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
4

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.