Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Pune ZP Election- जिल्हा परीषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात वरचष्मा असुन, त्यांनी जिल्हा परीषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 21, 2026 | 11:19 AM
Maharashtra Zilla Parishad Election 2026, ZP Election Schedule, Local Body Polls Maharashtra, Panchayat Samiti & ZP Elections

Maharashtra Zilla Parishad Election 2026, ZP Election Schedule, Local Body Polls Maharashtra, Panchayat Samiti & ZP Elections

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परीषदेच्या निमित्ताने पक्षांतर सुरू
  • अजित पवारांकडून जिल्हा परीषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु
  • नाराजांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी
Pune Zilla Parishad Election 2026:  पुणे महापालिका पाठोपाठ आता जिल्हा परीषदेच्या निमित्ताने पक्षप्रवेश सुरु झाले आहे. शिरुरच्या माजी आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जिल्हा परीषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात वरचष्मा असुन, त्यांनी जिल्हा परीषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. सोमवारी शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ भाजपनेही पक्ष प्रवेश करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने काही नाराजांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी होत असल्याचे दिसुन येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून, शिरुरचे माजी शिवसेना आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप  दादा कंद, आमदार राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे, धर्मेंद्र खांडरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश माननीय मोदीजींवर प्रचंड प्रेम करत आहेत. त्याशिवाय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

भाजपमध्ये सन्मान मिळत असल्याचे मत

यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Zilla parishad election 2026 popatrao gawade of shirur along with his family joins bjp for the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Maharashtra Zilla Parishads Election
  • Panchayat Samiti Election
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
1

Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल
2

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.