नामांकित बटाटा व्यापारी
आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव शेख करीम शेख चुन्नू असे आहे. ते वैजापूर शहरातील नामांकित बटाटा व्यापारी आहे. आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांनी सावकारांनी लावलेल्या पैश्यांच्या तगादा आणि मानसिक छळातून आत्महत्या केली आहे. त्यांनी ४२ सेकंदाचा व्हिडीओ बनवला होता. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत काय?
व्हिडीओमध्ये शेख करीम म्हटलं की, “ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे. मै घरवालोंसे बहुत प्यार करता हू लेकीन मै थक गया हू. मैं खुदखुशी कर रहा हू..” या व्हिडिओवरून शेख करीम हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते, हे स्पष्टपणे जाणवते.
७ सावकारांवर गुन्हा दाखल?
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरु केला आहे. शेख करीम यांनी व्हिडिओमध्ये उल्लेख केलेली नावे आणि कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ७ सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर सावकारी आणि व्याजाच्या वसुलीसाठी दिला जाणारा त्रास या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. शेख करीम यांच्या आत्महत्येमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात सोमवारी पहाटे सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने थेट गोळीबार करून दहशत निर्माण केली. घरावर दगडफेक करत एका नागरिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी शुभम भिखुलाल जाट, मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर प्रशांत राऊत आणि अमर उर्फ अतुल गणेश पवार यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात.
Ans: बेकायदेशीर सावकारीचा तगादा व मानसिक छळ.
Ans: व्हिडिओ व कुटुंबीयांच्या माहितीनुसार 7 सावकारांवर गुन्हा दाखल केला.






