शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालात अंतिम सुनावणी
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन्ही गटाच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.
आज सकाळी साडे अकरा वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू केली, तर उद्याही ही सुनावणी होऊ शकते. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यातील हालचालींवरून ते पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद आपापसात सोडवण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. पण जोपर्यंत शरद पवार जोपर्यंत न्यायालयातून त्यांच्या याचिका परत मागे घेत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणावर सुनावणी होतच राहिल.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणार आहे. मात्र, ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या मते, ही सुनावणी ३७ व्या क्रमांकावर असल्याने ती आजच पूर्ण होणे कठीण वाटते.
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिवसेनेच्या प्रकरणाची सुनावणी आहे, मात्र ती ३७ व्या क्रमांकावर असल्याने आज सुनावणी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. वकील असीम सरोदे यांनी यावर काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. चिन्ह आणि नाव गेल्यास शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल आणि ‘स्वगृही’ परतणाऱ्यांची संख्या वाढेल.






