डेप्युटी सीईओ स्मिता पाटील चौकशीच्या कचाट्यात
सोलापूर : गेल्या कित्येक दिवसापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही बातमी आहे. आरोग्य विभागाने नर्स व आरोग्य सेवक या पदासाठी रविवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आयोजित केलेली परीक्षा पुढे ढकलली आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून सुरू करण्यात येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ११४ पदासाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये एमबीबीएस डॉक्टर नर्स व आरोग्य सेवकांची पदभरती होणार आहे. डॉक्टरांची भरती थेट मुलाखतीद्वारे घेतली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने नर्स व आरोग्य सेवकाच्या पदांसाठी ११ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट, परीक्षा केंद्राबाबत कळविण्यात आले होते. त्यामुळे अर्ज केलेले उमेदवार परीक्षेच्या तयारीत गुंतले असतानाच आरोग्य विभागाने परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक जारी केले आहे.
त्यामुळे या पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेच्या पदभरतीची परीक्षा ११ सप्टेंबर रोजी देशभरातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी नमूद केले आहे. आता परीक्षेची पुढील तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.
[read_also content=”महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी https://www.navarashtra.com/maharashtra/revenue-minister-radhakrishna-vikhe-patil-inspected-the-heavy-rain-affected-area-nrdm-324329.html”]
भरती रखडलेलीच…
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील रिक्त पदांबाबत यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले आहेत. रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजात अडचणी येत आहेत. या पदांच्या भरतीबाबत अद्याप पाऊले उचलली न गेल्याने अर्ज केलेले उमेदवार प्रतीक्षेत आहेत. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही भरती रखडली गेल्याचे जिल्हा परिषदेत चर्चा आहे.