Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Roy चा भयंकर डाऊनफॉल! कुठे गेले ‘अच्छे दिन’, कंटेट क्रिएटरसोबत भयानक व्हिडिओ व्हायरल, अखेर सोडले मौन

'आशिकी' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता राहुल रॉयच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट दिवस असं व्हायरल व्हिडिओ पाहून लोक कमेंट करत आहेत आता यावर राहुलने मौन सोडले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 30, 2026 | 11:20 AM
राहुल रॉय झाला ट्रोल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

राहुल रॉय झाला ट्रोल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राहुल रॉयवर काय आली ही परिस्थिती? 
  • लोकांनी केले ट्रोल
  • व्हायरल रीलवर राहुलने सोडले मौन 
तुम्ही जरी ‘Gen Z’ असाल, तरी तुम्ही १९९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’ आणि त्याच्या देशव्यापी क्रेझबद्दल ऐकले असेलच. या चित्रपटाने मुख्य कलाकार, राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना रातोरात स्टार बनवले होते. त्यातील जॅकेट सीन इतका अविस्मरणीय होता की, अनेक वर्षांनंतर त्याच्या सिक्वेलमध्ये तो पुन्हा तयार करण्यात आला आणि त्याची गाणी आजही चहाच्या दुकानांमध्ये आणि लहान शहरांच्या टपऱ्यांवर ऐकू येतात. पण राहुल रॉय अचानक प्रकाशझोता आला आहे तेदेखील चुकीच्या कारणामुळे. त्याच्या अशा अचानक दिसण्याने लोकांनाही धक्का बसला आहे. 

राहुल रॉयचा स्टारडम अल्पकाळ टिकला. ‘आशिकी’ची जादू पुन्हा निर्माण करण्यात अयशस्वी ठरल्याने, राहुल रॉय आणि अनु अग्रवाल दोघेही हळूहळू प्रसिद्धीच्या झोतातून नाहीसा झाले. नोव्हेंबर २०२० मध्ये, राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला, ज्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले. तेव्हापासून तो प्रसिद्धीपासून दूर राहिला आहे, अधूनमधून सोशल मीडियावर त्याच्या कार्यक्रमांचे फोटो आणि अपडेट्स शेअर करत असतो. पण त्याच्या नवीन ऑनलाइन अवताराने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. हा अभिनेता अलीकडेच काही अज्ञात इंटरनेट क्रिएटर्ससोबत रील्स बनवताना दिसला आणि नेटकऱ्यांना हे आवडलेले नाही. यामुळे त्याला खूपच ट्रोल करण्यात आले आहे. 

350 चित्रपटांचा तगडा अनुभव, BR चोप्रांच्या ‘महाभारत’ मधून ‘शिखंडी’ही गाजला, तरीही म्हणतोय ‘मी अ‍ॅक्टर नाही…’

राहुल रॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला

डॉ. वनिता घाडगे नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्तीने राहुल रॉयचे काही रील्स अपलोड केले आहेत, ज्यामध्ये ते दोघे ‘आशिकी’ आणि ‘फिर तेरी कहानी याद आयी’ यांसारख्या त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर नाचताना दिसत आहेत. हे खूपच विचित्र दिसत असून, लोक खूपच वाईटरित्या यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 

एका रीलमध्ये, ती राहुलसोबत पोज देते आहे आणि ‘तेरे डर पे सनम’ या गाण्यावर लिप-सिंक करते, तर राहुल फ्रेममध्ये भावशून्य उभा राहिलेला दिसून येत आहे. इतर रील्ससुद्धा काही फारशा चांगल्या नाहीत; प्रत्येक रीलमधून तीच विचित्र, अस्वस्थ करणारी ऊर्जा जाणवते, जी खूपच खटकते. जर तुम्ही ९० च्या दशकात ‘आशिकी’ची क्रेझ पाहिली असेल, जर तुम्हाला राहुल रॉयची क्रेझ आठवत असेल, तर या रील्स पाहण्याने तुम्हाला अंगावर शिसारी येईल. 

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

राहुलने सोडले मौन 

राहुलने याबाबत आपले मन सोशल मीडियावर व्यक्त करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. राहुल म्हणतो की, ‘मी माझं काम प्रामाणिकपणे आणि नम्रपणे करतो. मला काही कायदेशीर बाबींसाठी पैसे द्यावे लागतात, आणि हे आजचे नाहीत, हे मला ब्रेन स्ट्रोक होण्यापूर्वीच्या काळातील आहेत. जर तुम्ही माझ्या साधेपणावरून किंवा माझ्या समस्यांवरून माझी चेष्टा करत असाल, तर ते माझ्यापेक्षा तुमच्याबद्दलच जास्त व्यक्त होत आहे. जर तुम्हाला खरंच इतकी काळजी वाटत असेल, तर मला एक चांगली, कायदेशीर नोकरी शोधायला मदत करा, जेणेकरून मी माझ्या खटल्यांचे पैसे भरू शकेन. निदान मी माझ्या मेहनतीने कमावतोय, दुसऱ्यांची चेष्टा करून नाही आणि माझ्या ब्रेन स्ट्रोकनंतर, सक्रिय राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला आयुष्यभर काम करायचं आहे. त्यामुळे माझं मन सक्रिय राहतं आणि मी अजूनही काम करत आहे ही जबाबदारीची जाणीव मला मिळते. यामुळे मला कधीतरी त्रास होऊ शकतो, पण तुम्ही मला तोडू शकत नाही.’ 

या त्याच्या व्यक्त होण्यानंतर जगण्यासाठी खरंच राहुल रॉयची कोणी मदत करू शकणार का? किंवा नक्की त्याच्यावर काय परिस्थिती उद्भवली आहे हे कोणी जाणून घेणार का हा प्रश्न उरतोच. या घटनेनंतर पुन्हा एकदा स्टारडमच्या या काळ्या दुनियेचं कटू सत्य बाहेर आलं आहे. 

Web Title: Aashiqui actor rahul roy reel with content creator viral fans are trolling he gave explanation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Anup Jalota Birthday : ७२व्या वाढदिवसानिमित्त अनुप जलोटांच्या घरी रंगली सुरांची मैफल; संगीत क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती
1

Anup Jalota Birthday : ७२व्या वाढदिवसानिमित्त अनुप जलोटांच्या घरी रंगली सुरांची मैफल; संगीत क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती

‘पतीला घाबरून गप्प राहिले…’, बादशाहच्या दुसऱ्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ
2

‘पतीला घाबरून गप्प राहिले…’, बादशाहच्या दुसऱ्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
3

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Karan Kundrra: मॉरिशसमध्ये करण-तेजस्वीचा रोमँटिक क्षण; पाण्याखाली खास सरप्राइझने चाहत्यांची मने जिंकली
4

Karan Kundrra: मॉरिशसमध्ये करण-तेजस्वीचा रोमँटिक क्षण; पाण्याखाली खास सरप्राइझने चाहत्यांची मने जिंकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.