आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतने बायकोला केलं लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले खास रोमँटिक Photos
‘इंडियन आयडॉल १’चा विजेता आणि ‘बिग बॉस मराठी ५’चा उपविजेता गायक अभिजित सावंत आहे. आपल्या आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेल्या गायकाने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिजित सावंत कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून गायक चाहत्यांसोबत अनेकदा त्याच्या गाण्याच्या रिल्स, व्हिडिओ किंवा फोटोज् शेअर करत असतो. अशातच गायकाने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे.
‘Maalik’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार राव दिसला डॅशिंग अंदाज
गेल्या काही दिवसांपासून अभिजित त्याच्या कुटुंबीयांसोबत परदेशामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. परदेश दौऱ्यादरम्यानचे फोटोज् आणि व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिजितची पत्नी शिल्पा हिच्या वाढदिवसानिमित्त गायकाने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे. त्याने पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळ पत्नीसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केलेला आहे. त्यांच्या ह्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अभिजितने बायको शिल्पा हिला वाढदिवसानिमित्त रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“मैत्रीच्या करकच्चून गाठी जुळल्या की मग…” ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्याची ‘कमळी’साठी खास पोस्ट
अभिजीतनं शेअर केलेल्या फोटोमध्ये गायक आणि त्याची पत्नी शिल्पा आयफेल टॉवरखाली एकमेकांना किस करताना दिसत आहेत. तर यासह अभिजीतनं शिल्पाबरोबरचे इतर काही रोमँटिक फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत. अभिजीतनं या फोटोंना ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिजीतनं पोस्ट केलेल्या या फोटोंखाली अभिजितच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर अभिजितने शेअर केलेली वाढदिवसाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर स्पृहा जोशीने शेअर केली कविता; म्हणाली, “जीआर रद्द झाला पण…”
शिल्पा आणि अभिजीतने ३ डिसेंबर २००७ साली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर शिल्पा आणि अभिजितला दोन मुली आहेत. अभिजीतच्या संघर्षकाळात शिल्पाने त्याला खंबीरपणे साथ दिली. ‘इंडियन आयडॉल’ जिंकल्यानतंर त्याला खऱ्या अर्थानं मोठा ब्रेक मिळाला. अभिजीत ‘बिग बॉस’मध्ये असताना शिल्पा त्याला भेटायला गेली होती. तर, अभिजीत आणि शिल्पा सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत असतात.