Lakshmi Niwas Actor Anand Prabhu Shared Special Post For Kamali Actress Vijaya Babar
सध्या सोशल मीडियासह सर्वत्र झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. ही मालिका ३० जूनपासून म्हणजेच कालपासूनच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेमध्ये ‘कमळी’ची भूमिका अभिनेत्री विजया बाबर साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठीच्या इतर मालिकांमधून ‘कमळी’ मालिकेचे प्रमोशन होताना पाहायला मिळालं. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतदेखील नुकतीच कमळीची एन्ट्री पाहायला मिळाली. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील एका कलाकाराने कमळीसाठी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर स्पृहा जोशीने शेअर केली कविता; म्हणाली, “जीआर रद्द झाला पण…”
‘लक्ष्मी निवास’ मालिकेमध्ये अभिनेत्री विजया बाबर प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी अभिनेता आनंद प्रभू आणि अभिनेता अनुज ठाकरे याने विजयासोबत फोटो काढले. ते फोटो शेअर करताना आनंदने कॅप्शन दिले की…
“एकदा मैत्रीच्या करकच्चून गाठी जुळल्या की मग वारंवार भेटी नाही झाल्या तरी चालतात… आणि त्यात जर का बऱ्याच महिन्यानंतर भेट झालीच तर मग काय, कडकडून, निगरगट्ट, जालीम, चिव्वट अस्सा सेकंदाचा शंभरावा भाग देखील वायफळ वाया न घालवणाऱ्या हास्यांचा आणि गप्पांचा चौफेर दणकाच.
प्रिय, विजया…
तुझी नविन मालिका झी मराठी वर येतेय “कमळी” त्यासाठी तुला आणि “कमळी”च्या सगळ्या टीमला खुप खुप खुप शुभेच्छा…. खुप मोठी हो मैत्रीण…. कमळी मालिकेच्या प्रोमोशन निमित्ताने तु ‘लक्ष्मी निवास’च्या सेटवर आलीस थोड्या वेळे करीताच भेट झाली पण पोटभर खिदळून घेतलं, किमान वेळेत कमाल हसण्याच विक्रम मोडत, मध्येच आपण इमोशनल होऊन आपल्या डोळ्यांचे काठही अकस्मात ओलावले गेले, हे देखील उत्तमच घनिष्ठ डिंकाने घट्ट जोडली गेलेली आपली मैत्री निव्वळ जन्मजन्मंतरीची. यात शंका नाही. तुझी मेहनत, क्षमता,सातत्य,आत्मविश्वास, सदा सकारात्मकता पसरवणारी तुझी उर्जा आणि कुशल अभिनयाचा जोम तुला यशस्वी होण्याचे आणि उज्वल भविष्यचे अलौकिक संकेत वेळोवेळी ईश्वर देत राहीलच .. आणि याचा पुर्वानुमान लावण्यासाठी जोतिष्य अभ्यासकाचीही गरज नाहीच, इतक सगळं ठाम आणि निश्चीत …जानदार जय हो।
या मालिकेत कमळी आई साकारतेय उत्तम अभिनेत्री माझी जिगरवाली पक्की मैत्रीण योगिनी चौक हिला देखील खुप शुभेच्छा
नविन सुरवाती करीता “कमळी”च्या संपुर्ण टिम ला मनापासुन शुभेच्छा…”
करण जोहरने उघड केले बॉलीवूड व्हॉट्सॲप ग्रुपचे गुपित, म्हणाला- ‘जर चॅट्स लीक झाले तर …’