Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नजरेचा अभ्यास आणि लुक्सवर केले काम, आयुष वाघने सांगितला ‘महिपती’ भूमिकेचा अनुभव

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या शिवा आणि जगदंबेच्या आयुष्यात विष कालविण्याचा प्रयत्न महिपती करतोय. ही भूमिका अभिनेता आयुष वाघ साकारतोय. याबाबत त्याने दिलखुलासपणे गप्पा मारल्यात

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 29, 2025 | 02:42 PM
महिपतीची भूमिका साकारणाऱ्या आयुष वाघने व्यक्त केल्या भावना

महिपतीची भूमिका साकारणाऱ्या आयुष वाघने व्यक्त केल्या भावना

Follow Us
Close
Follow Us:

‘आई तुळजाभवानी’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली असून 400 भाग पूर्ण केलेत. जगदंबा आणि शिवाच्या आयुष्यात महिपती नावाचं जे वादळ आलं आहे ते प्रेक्षकांना सध्या गुंतवून ठेवत आहे. महिषासुराचा अंश असणारा महिपती सध्या पाताळात अंधःकार शक्तींना आव्हान करतोय आणि जगदंबेला त्रास देत असल्यामुळे प्रेक्षक टीव्ही अक्षरशः खिळून राहिले आहेत. अंधःकार शक्ती आणि महिपतीच्या या  मायावी गूढ डावाला जगदंबा कशी सामोरी जाणार हाच प्रश्न आहे.

महिपतीची ही भूमिका सध्या नवा चेहरा अभिनेता आयुष वाघ साकारतोय. महिषासुराची भूमिका दिग्गज कलाकार राजशेखर करत होते आणि त्यांची ही भूमिका पुढे घेऊन जाताना अनुभव काय होता याबाबत आयुषने ‘नवराष्ट्र’सह दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत. 

महिपती भूमिका साकारताना कसं वाटतंय?

‘मालिकेत अभिनय करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे,’ अगदी उत्साहाने आयुष म्हणाला. ‘हे वातावरण माझ्यासाठी अगदी नवीन होतं. पण मला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं असो वा काम करताना पाठिंबा देणं असो सेटवर सर्वांनी खूप सांभाळून घेतलं आहे. ऑडिशन दिल्यानंतर लुक टेस्टसाठी फोन आला आणि लुक टेस्ट झाल्यावरच ही भूमिका मिळाली. त्यामुळे असं काम करताना खूप मजा येत आहे. सध्या या मालिकेत महिपतीचं काम जास्त आहे, त्यामुळे अभिनय करायला अधिक उत्साह येतोय. याशिवाय मालिका एका वेगळ्या वळणावर आहे जिथे महिपतीने जगदंबेला त्रास द्यायला सुरूवात केली आहे.’

मुख्य भूमिका पहिल्यांदाच करण्याची संधी, कमालीचा अनुभव – सृजन देशपांडे

इतक्या कमी वयात ही भूमिका साकारण्यासाठी काय अभ्यास केला?

आयुष म्हणाला की, ‘ आई तुळजाभवानी मालिकेत राजशेखर यांनी महिषासुराची भूमिका खूपच छान केली आहे आणि त्यांचा अंश साकारण्याची मला संधी मिळाली. महिपती भूमिकेसाठी काम सुरू करण्यापूर्वी मालिकेचे जुने भाग पाहिले. चिंचपूरचा इतिहास काय होतो तो वाचला, त्यानुसार माझ्या भूमिकेसाठी काय बदल करावे लागतील याचा विचार केला. याशिवाय महिपती हा असुर आहे त्यामुळे नजरेचा खास अभ्यास केला आणि माझ्या दिसण्यावर आणि लुक्सवर अधिक काम केले. यामुळेच कदाचित या मालिकेत मला काम करताना अधिक अनुभव घेता येतोय आणि मजाही येतेय’ हे सांगायला आयुष विसरला नाही. 

कलाकारांसह केमिस्ट्री कशी सेट झाली?

‘मी नवीन असलो तरीही मला सर्वांनी खूपच पाठिंबा दिला. एकमेकांसह संवादाचा सराव करणे किंवा संवाद अडल्यास तो कसा कव्हर अप करता येईल याकडे पाहणे हे आपसुकच झाले. नाटक हा आमचा सर्वांचा कॉमन विषय असल्याने पटकन मैत्री झाली आणि केमिस्ट्री जुळायला वेळ लागला नाही. जेव्हा आम्ही एकत्र असतो सगळेजण गप्पा मारतो आणि खूप धमाल करतो.’

भूमिकेसाठी काय विशेष मेहनत घेतलीस?

‘पहिलीच मालिका पौराणिक विषयावरची मिळाली आहे, यासाठी भाषा थोडी वेगळी असते आणि त्यामुळे भाषा आणि त्याच्या लहेजावर मेहनत घेतली. पण भाषा स्पष्ट असल्याने जास्त मेहनत करावी लागली नाही’ असे आयुषने सांगितले. आयुष साकारत असणारी महिपतीची भूमिका ही नकारात्मक आहे आणि त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांनाही त्याची ही भूमिका आवडत आहे आणि सध्या त्याच्या या भूमिकेला मालिकेतही विशेष वाव मिळतोय. 

‘जशी आहे तशीच’ काम करतेय त्यामुळे अभिनय करण्याची गरज नाही भासली – विजयालक्ष्मी कुंभार

Web Title: Actor ayush wagh shared his experience working in aai tuljabhavani as mahipati charachter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : विशालने प्रभूला दाखवला शब्दांचा फरक! विशालच्या नव्या अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन
1

Bigg Boss Marathi 6 : विशालने प्रभूला दाखवला शब्दांचा फरक! विशालच्या नव्या अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.