Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, वाढदिवशी दिग्दर्शन क्षेत्रात ठेवले पाऊल; केली पहिल्या चित्रपटाची घोषणा

गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 09, 2025 | 04:13 PM
गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, वाढदिवशी दिग्दर्शन क्षेत्रात ठेवले पाऊल; केली पहिल्या चित्रपटाची घोषणा

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, वाढदिवशी दिग्दर्शन क्षेत्रात ठेवले पाऊल; केली पहिल्या चित्रपटाची घोषणा

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे.

सोनाक्षी सिन्हाची तब्येत बिघडली, केली कोरोनाची चाचणी; पती जहीरनं शेअर केलेला मजेशीर व्हिडीओ चर्चेत

या चित्रपटाचे निर्माते गौरी महाजनी, माधवी महाजनी आणि गश्मीर महाजनी असून लेखन व दिग्दर्शन गश्मीर स्वतः करत आहे. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेला गश्मीर आता कॅमेऱ्यामागे जाऊन एक नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम यांच्या कॅमेऱ्यातून साकारले जात आहे. गश्मीरच्या या नव्या इनिंगबद्दल मराठी सिनेसृष्टीतूनही शुभेच्छांचा वर्षाव होत असून या चित्रपटाचं नाव आणि कलाकार जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

‘Housefull 5’ ने तिसऱ्या दिवशी मोडला ‘या’ १० चित्रपटांचा रेकॉर्ड, ‘रेड’ आणि ‘सिकंदर’ यांनाही टाकले मागे!

आपल्या या नवीन प्रवासाविषयी गश्मीर महाजनी म्हणतो, “दिग्दर्शन हे माझं एक दीर्घकाळापासूनचं स्वप्न आहे. अभिनय करताना अनेक गोष्टी शिकल्या, अनुभवल्या आणि आत खोलवर काही सांगायचं राहून गेलं होतं. आता त्या भावना, ती विचारांची प्रक्रिया मी कॅमेऱ्याच्या मागून मांडणार आहे. चित्रपट ही एक सामूहिक कला आहे, मात्र काही कथा अशा असतात, ज्या फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच सांगितल्या जाऊ शकतात. माझा हा चित्रपट म्हणजे माझ्या मनात कित्येक वर्षांपासून रुजत गेलेली कल्पना आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही गोष्ट सुरू करत असल्यामुळे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहेत. ही जबाबदारी मोठी आहे, परंतु प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम हेच माझं बळ आहे.”

Web Title: Actor gashmeer mahajani directorial debut new movie set photos with wife gauri deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.