Sonakshi Sinha Tests Negative For COVID After Catching Viral Fever Hubby Zaheer Posts Video Singing For His Chanda
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. लवकरच या कपलची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारं हे कपल सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलं आहे. सध्या सोनाक्षीची तब्येत बिघडली आहे. तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिने Covid-19 ची चाचणी देखील केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली आणि तिने स्वतः तिच्या इन्स्टा स्टोरीवर याबाबत माहितीही दिली.
झहीर इक्बालने “ही मुलगी व्हायरल झाली आहे.” असं कॅप्शन देत त्याने व्हिडिओ शेअर केलेला आहे. जहीरने इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी स्टीम घेताना दिसत आहे. यावर जहीर हा ‘घुंघट में चंदा है…’ हे गाणं मिश्कील पद्धतीने म्हणताना दिसतोय. त्यांच्या या गोड क्षणांनी चाहत्याचं मन जिंकून घेतलं आहे. झहीर इक्बालने म्हटलेल्या वाक्याचा अर्थ म्हणजे सोनाक्षीला ताप, सर्दी आणि खोकला झाला आहे. सोनाक्षीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘Hera Pheri 3’ मध्ये पुन्हा परतणार ‘बाबूभैया’? परेश रावल यांनी स्वतःच दिले उत्तर!
झहीर इक्बालने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशीने हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. अनेक चाहत्यांनी सोनाक्षीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षीने नुकतंच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये Covid-19 ची चाचणी अहवालाचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला जो निगेटिव्ह आला आहे. तिने तो उडी मारणाऱ्या इमोजीसह पोस्ट केला.