kiran mane
आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) सध्या वेगळयाच कारणाने चर्चेत आले आहे. किरण माने आता अभिनय क्षेत्रातुन थेट राजकारणाकडे वळताना दिसत आहे. किरण माने आज शिवबंधन (Shivsena) हाती बांधणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray) ते प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे (udhhav thavckray) यांच्य उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून किरण माने ठाकरे गटासोबत जोडले जाणार आहे.
[read_also content=”मुंबईत रजिस्टर मॅरेज केल्यानंतर आता उदयपूरमध्ये इरा नुपुरचा शाही विवाहसोहळा, उद्या पुन्हा बांधणार लग्नगाठ! https://www.navarashtra.com/latest-news/iran-khan-nupur-shikare-wedding-at-udaypur-on-8-january-nrps-495757.html”]
‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) आणि ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांचा आज राजकीय प्रवेश होणार आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप (BJP) विरोधात भूमिका घेत असल्याने एका मनोरंजनक करणाऱ्या वाहिनीतून काढल्याचा माने यांनी आरोप केला होता. याबद्ददल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते. यानतंर किरण माने अचानक चर्चेत आले.
आज मातोश्रीवर अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. अभिनेते किरण मानेदेखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहे. यासोबचत बीडमधील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटात प्रवेश होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) घाटकोपर उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम यांचाही ठाकरे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत काही मनसेचे कार्यकर्तेदेखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून अभिनेते किरण माने घराघरात पोहोचले आहेत. सोशल मीडियावरुन सतत ते आपले अनुभव शेअर करत असतात. अनेकदा वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून राजकीय भूमिकाही मांडत असतात. त्यांच्या या वादग्रस्त पोस्टमुळे अनेकदा ते ट्रोल होतात. ‘सातारचा बच्चन’ अशी किरण माने यांची ओळख आहे. ‘मुलगी झाली हो’ ही त्यांची गाजलेली मालिका. सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत किरण माने यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती.