Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : ‘एनडीए’कडून श्रीकांत शिंदेंची ‘या’ पदासाठी नियुक्ती, बैठकीत महत्त्वाचा निर्णय

‘एनडीए’तला भाजपचा सर्वात विश्वासू आणि जुना मित्र पक्ष या नात्याने शिवसेनेचे खासदार डॉ. शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2025 | 06:24 PM
'एनडीए'कडून श्रीकांत शिंदेंची 'या' पदासाठी नियुक्ती (फोटो सौजन्य-X)

'एनडीए'कडून श्रीकांत शिंदेंची 'या' पदासाठी नियुक्ती (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती केली. या निमित्ताने ‘एनडीए’तला भाजपचा सर्वात विश्वासू आणि जुना मित्र पक्ष या नात्याने शिवसेनेचे खासदार डॉ. शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मंगळवारी ९ सप्टेंबर २०२५ रोजी संसदेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाचे ‘एनडीए”चे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांना यापूर्वीच शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी नवी दिल्ली शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. या बैठकीत मतदान कसे करायचे, मतदानाची प्रक्रिया खासदारांना समजावून सांगण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. शिंदे यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि मंत्री राम मोहन नायडू हे ‘एनडीए उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून काम पाहणार आहेत.

 कामाचे तास ९ वरुन १२ तास निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा; कामगार संघटनेचा इशारा

कल्याण लोकसभा मतदार संघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या खासदार डॉ. शिंदे यांची संसदेत एक अभ्यासू संसदपटू अशी ओळख आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी भारताची भूमिका आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्राने पाठवलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे डॉ. शिंदे यांनी नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळाने यूएई, काँगो, सिएरा लिओन, लायबेरिया या देशांना भेटी देऊन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका ठामपणे मांडली होती. आंतरराष्ट्रीय मंचावर भारत सरकारच्या वतीने प्रतिनिधीत्व करताना खासदार डॉ. शिंदे यांचे नेतृत्वगुण या दौऱ्यातून अधोरेखीत झाले. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे जाहीर कौतुक केले होते.

डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे काय निर्देश?

येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक सोमवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोलावली आहे.

Mira Bhayander News : विकासकामांच्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती;  प्रताप सरनाईकांचा संताप अनावर 

Web Title: Dr shrikant shinde appointed as candidate representative by the nda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • NDA
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात…भाजप सेक्युलर झाला; खासदार संजय राऊत यांनी लगावला टोला
1

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात…भाजप सेक्युलर झाला; खासदार संजय राऊत यांनी लगावला टोला

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा
2

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका
3

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
4

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.