Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात…भाजप सेक्युलर झाला; खासदार संजय राऊत यांनी लगावला टोला

Vice Presidential Election 2025 : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. .यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 08, 2025 | 12:24 PM
mp sanjay raut angry over shinde group leader on Vice Presidential Election 2025 cross Voting

mp sanjay raut angry over shinde group leader on Vice Presidential Election 2025 cross Voting

Follow Us
Close
Follow Us:

Vice Presidential Election 2025 : मुंबई : दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून उद्या (09 सप्टेंबर) मतदान होणार आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये राजकीय खडाजंगी रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पितृपक्षामध्ये निवडणूक घेत असल्यामुळे भाजप सिक्युयर झाली असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत खासदार राऊत यांनी टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत रंजक आहे. सर्वातआधी भाजपच अभिनंदन केलं पाहिजे. एरवी भाजप मुहूर्त काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतो, हिंदुत्वादी पक्ष म्हणून. यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. भाजप सेक्युलर झाला. मुहूर्त, पंचाग पाहत नाही हे त्यांनी दाखवून दिलं, या बद्दल त्यांचं अभिनंदन,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचाग पाहणार, तिथी पाहणार म्हणून भाजपने दहा वर्षात पहिल्यांदाच स्वत:ला सेक्युलर घोषित केल्यासारखं वाटतय. पितृपक्षाच्या पहिल्या दोन दिवसातच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. येणाऱ्या उपरराष्ट्रपतींनी सावध रहायला पाहिजे. कारण आधीच्या उपराष्ट्रपींच काय झालय, अद्याप कळायला मार्ग नाही. जो पर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही, तो पर्यंत ते गायब आहेत. त्यांच्याविषयी शंका कायम राहतील” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

लालबाग विसर्जन मिरवणूकीला उशीर झाला असून यावरुन अनेकांनी जोरदार टीका केली आहे. लालबागच्या राजाचा विसर्जन चंद्रग्रहण सुरु असताना झाले असल्याचे आहे. लालबागच्या राजाच्या व्यवस्थापनाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “यावर कसं काय मत व्यक्त करु. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी अद्याप कधी तिथे गेलो नाही. “मी गणपती दर्शन करत असतो. कोणी बोलावल, तर जातो. घरी गणपती असतो. पण मी तिकडला प्रकार एकंदरीत दिसतो. ते पाहिल्यावर मला वाटलं की त्या गर्दीत अजून एकाची भर नको. लोकांनाही कळल पाहिजे. हिंदूत्ववादी असतील, श्रद्धा असेल गणपती घरातला, देव्हाऱ्यातला इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती एकच असतो. अलीकडे मला दिसतय लालबागचा राजा अमित शाहना जास्त पावतो. मराठी माणसाला तो जास्त पावताना दिसत नाही. मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल, तेव्हा मी त्या गणपतीच्या दर्शनाला नक्की जाईन,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut targets bjp over vice presidential election 2025 political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena
  • Vice Presidential Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “नकली सब घर पे, असली…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
1

Maharashtra Politics: “नकली सब घर पे, असली…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

संभाजीनगरमध्ये युतीचा पेच वाढला! ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेवरून शिवसेना-भाजपात खलबते; जागावाटपाचा चेंडू आता मुंबईच्या कोर्टात
2

संभाजीनगरमध्ये युतीचा पेच वाढला! ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेवरून शिवसेना-भाजपात खलबते; जागावाटपाचा चेंडू आता मुंबईच्या कोर्टात

Breaking News : दोन दशकानंतर महाराष्ट्राचे स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
3

Breaking News : दोन दशकानंतर महाराष्ट्राचे स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा

Thackeray Brothers :राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचे जागावाटप काल रात्री…! अमराठी जागांसाठी खास प्लॅन? खासदार राऊतांनी स्पष्ट सांगितल
4

Thackeray Brothers :राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचे जागावाटप काल रात्री…! अमराठी जागांसाठी खास प्लॅन? खासदार राऊतांनी स्पष्ट सांगितल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.