
actor milind gawali visit to chhatrapati shivaji maharaj vastu sangrahalaya and shared his experience
फोर्ट परिसरामध्ये भरणारा काळा घोडा फेस्टिव्हलहा मुंबईकरांचा आवडीचा फेस्टिव्हल आहे. या फेस्टिव्हलमध्ये, फक्त मुंबईकरच नाही तर, आजुबाजुच्या परिसरातूनही नागरिक येत असतात. ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ची क्रेझ सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईंमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. या फेस्टिव्हलमध्ये, मराठमोळा अभिनेता मिलिंद गवळीही गेला होता. तो आपल्या पत्नीसोबत तिथे गेला होता.
यानंतर अभिनेत्याने आपल्या पत्नीसोबत मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ला भेट दिली. या १०३ वर्षे जुने असलेल्या वास्तुला भेट दिल्यानंतर अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्या वास्तुला भेट दिल्यानंतरचा अनुभवही शेअर केला आहे. त्याशिवाय मनातील एक मोठी खंतही व्यक्त केली आहे.
१०३ वर्षे जुन्या असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ वास्तुला भेट दिल्यानंतर अभिनेता मिलिंद गवळीने आलेला अनुभव त्यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी म्हणतात,
” ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ मुंबई, पूर्वी याचं नाव होतं प्रिन्स ऑफ व्हिल्स म्युझियम, १०३ वर्षांपूर्वी हे म्युझियम बांधलं होतं. १० जानेवारी १९२२ साली याचं उद्घाटन झालं, इंग्रजांनी हे बांधलं होतं, त्यांनी नंतर ‘गेटवे ऑफ इंडिया’ बांधलं, मुंबई हायकोर्ट बांधलं, दिल्लीला इंडिया गेट बांधलं, राष्ट्रपती भवन पण त्यांनी बांधलं. मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग, क्रॉफर्ड मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई युनिव्हर्सिटीची बिल्डिंग, त्या वेळचं इतकं सुंदर architectural आणि आजही भक्कम बांधकाम, परवा काला घोडा फेस्टिवलला गेलो आणि या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’मध्ये पण गेलो. या वास्तू बघून फारच भारी वाटतं, या ब्रिटिशरांच्या आधी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेत, आजही किल्ल्यांवर गेलं की खूपच भारी वाटतं, इतिहास डोळ्यासमोर येतो, त्या काळात इतकं भव्य दिव्य बांधकाम कसं केलं असेल याची कल्पना सुद्धा करता येत नाही. या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’मध्ये ५० हजार होऊन अधिक पुरातन काळातल्या वस्तू आहेत. त्यातला एक भाग आहे पूर्वीच्या चलनातल्या नाणी, त्याच्यामध्ये मी शिवाजी महाराजांच्या काळाची “होण”, नाणी पाहिली, सुवर्णमुद्रा बघायला मिळाली, मी महाराजांच्या काळाच्या या सुवर्णमुद्रा पहिल्यांदाच पाहिल्या, या आधी मी या संग्रहालयात गेलो होतो पण, त्यावेळेला ‘होण’पाहिल्याच माझ्या स्मरणात नाहीये, पण पूर्वच्या मोहींजोदारो, मोगल, ब्रिटिश, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी पाहून मला फारच भारी वाटलं. त्याकाळचे दागिने, मुर्त्या, गौतम बुद्धाच्या, आपला देव देवतांच्या मुर्त्या, पुरातन काळातले चित्र, त्यांचे वस्त्र, काही वस्तू तर रतन टाटा यांनी या संग्रहालयाला गिफ्ट दिलेले आहेत. त्या पण इथे बघायला मिळाले, दरवेळेला हे वस्तुसंग्रहालय बघायला येतो आणि वेगळाच अनुभव मिळतो, या वस्तू संग्रहालयातल्या वस्तू तुम्हाला वेगळा विश्वात घेऊन जातात, यावेळेला माझ्याबरोबर दिपा होती, ती पहिल्यांदा हे वस्तुसंग्रहालय बघत होते, ती पण खूपच भारावून गेली होती. आम्ही शाळेतल्या मुलांसारख्या पूर्वीच्या जुन्या जुन्या वस्तू पाहत होतो, पण हे सगळं पाहून एका गोष्टीची खूप खंत वाटत होती की ह्या ब्रिटिशरांनी आपल्याला देशातल्या किती सुंदर मौल्यवान वस्तू लुटून नेल्या आहेत, आपल्या कोहिनूर हिऱ्याचं रिप्लीका dummy इथे ठेवलेला आहे. ते बघून तर आणखीन त्रास झाला. आपला हिंदुस्तान किती समृद्ध होता याची पण जाणीव झाली. ज्यांनी कोणी हे पाहिलं नसेल त्यांनी जरूर बघावं ,शाळेतल्या मुलांनी नक्की बघावं…”
दिसण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना खुशी कपूरने सुनावले खडेबोल, नेमकं अभिनेत्री काय म्हणाली ?