फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी कपूरची आणि प्रसिद्ध बॉलिवूड सिनेनिर्माते बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर आहे. खुशीची मोठी बहिण जान्हवी कपूर ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अवघी कपूर फॅमिली बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे ही कपूर फॅमिली चर्चेत राहिली आहे. खुशी कपूरचा येत्या ७ फेब्रुवारीला ‘लव्हयाप्पा’ नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. तिच्या आता ह्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या खुशी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त व्यग्र आहे. ती वेगवेगळ्या वेबसाईटला आणि पॉडकास्टला मुलाखत देताना दिसत आहे. नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या बालपणीच्या अनेक आठवणी शेअर केलेल्या आहेत.
प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुशी कपूरला बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी आई श्रीदेवी आणि मोठी बहीण जान्हवी कपूरच्या लूकसोबत तिची तुलना केली जात होती. शिवाय तिला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं जायचं, असं सांगितलं आहे. त्या ट्रोलिंगचा तिच्या आयुष्यावर कोणता परिणाम झाला? याबद्दल तिने सांगितलं. मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “ही बाब फार निंदनीय आहे, बालपणी माझी दिसण्यावरुन अनेकदा खिल्ली उडवण्यात आली आहे. तू तुझ्या आई- बहिणीसारखी सुंदर दिसत नाही, असं म्हटलं जायचं. लहानपणीच अशी माझ्या लूकवरून खिल्ली ऐकल्यामुळे त्याचा परिणाम माझ्या आत्मविश्वासावर झाला आहे. त्यानंतर मी स्वत:कडे लक्ष द्यायला सुरुवात केली.”
“मला नाही वाटत की, या गोष्टीमध्ये काही गैर आहे. स्किनकेअर, फिलर्स या गोष्टींवर जास्त चर्चा करण्यासारखं काही नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. तुम्ही काही केलं किंवा नाही केलं तरी लोकं चर्चा करतात. बालपणी मला माझ्या दिसण्यावरुन लोकं टोमणे मारायचे, शिवाय मला ट्रोलही करायचे. आणि माझ्या लूक्सवरूनही मला ट्रोल करायचे. मी माझा लूक जरीही बदलला तरीही लोकांना समस्या येत होत्या. तुम्ही जे योग्य आहे तेच केले पाहिजे.”, असं अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली आहे.
ऐश्वर्या नाही तर करिश्मा कपूर असती बिग बींची सून; कोणत्या कारणामुळे मोडलं अभिषेकसोबतचं लग्न
रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह टुडे’ या तमिळ भाषेतील चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. ‘लव्ह टुडे’ या तमिळ भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रदीप रंगनाथन आणि रवीना रवी दिसले होते. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप रंगनाथननेच केलं होतं. ‘लव्हयापा’ हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित असेल. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीत या सर्व गोष्टीने परिपूर्ण असणारा हा चित्रपट आहे. जुनैद खानने ‘महाराज’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तर, खुशी कपूरने झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.