सागर कारंडेला चुना लावणाऱ्या 'अक्षय कुमार'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, केली होती ६१ लाखांची फसवणूक
‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला हास्यकलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडेबद्दल एक बातमी समोर येत आहे. सागर कारंडेला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. हास्यकलाकाराला स्वत: ची एक चूक चांगलीच महागात पडलीये. एका महिलेच्या जाळ्यात अडकला आणि लाखो रुपये गमावून बसला आहे. अवघ्या दीडशे रुपयांसाठी अभिनेत्याला लाखो रुपयांचा चुना लागला आहे. अभिनेत्याला फक्त दीडशे रुपयांसाठी ६१. ८३ लाखांचा गंडा त्याला घालण्यात आला आहे. नेमकं अभिनेत्यासोबत काय घडलंय ते जाणून घेऊयात….
Manoj Kumar: मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, रोगाची लक्षणे काय?
अभिनेत्याला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. इन्स्टाग्रामवर लाईक्सच्या बदल्यात १५० रुपयांचं आमिष दाखवून अभिनेत्याची फसवणूक करण्यात आली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अभिनेत्याच्या खात्यात २२ हजार रुपये देखील पाठवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अभिनेत्याच्या अकाऊंटमधून पैसे उकळण्यात आले. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. “इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा…” या प्रलोभनाला बळी पडलेल्या सागर कारंडेंची सायबर चोरट्यांनी तब्बल ६१ लाख ८३ रुपयांना फसवणूक केली.
मनोज कुमारने किती संपत्ती सोडली मागे? अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीतून केली एवढी कमाई!
फेब्रुवारी महिन्यात सागरला एका अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज आला होता. त्यामध्ये लाईक करा आणि पैसे कमवा अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती पाठवण्यात आली होती. तो अनोळखी व्हॉट्सअप नंबर एका महिलेचा होता. तिने त्या माध्यमातून अभिनेत्यासोबत संवाद साधला होता. टेलिग्रामसह अन्य सोशल मीडिया ॲपवरून पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं काम तुम्हाला असल्याचं त्या महिलेने सागरला सांगितलं. प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, अशा प्रकारे घरबसल्या सहा हजार रुपये कमावता येतील, अशी ऑफर असल्याचं सागरला सांगण्यात आलं. फारसं काही कठीण काम नसल्याने या कामाला सागरने होकार दिला. सागरने ठरल्याप्रमाणे काम आपण सुरु केल्याचं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
मनोज कुमारमुळे आज अमिताभ आहे सुपरस्टार? अभिनेत्याशी संबंधित जाणून घ्या पाच खास गोष्टी!
अभिनेत्याला त्या ऑफर अंतर्गत सुरुवातीला २७ लाख रुपये भरावे लागले होते. अभिनेत्याला हे पैसे कमिशन आणि मोबदला यासाठी वॉलेटवर जमा करायला सांगितले होते. शिवाय त्याचे पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत, अशी ग्वाही सुद्धा दिली होती. त्यामुळे अभिनेत्याने हे पैसे भरले होते. त्यानंतर अभिनेत्याला ११ हजाराचं काम सुद्धा देण्यात आलं होतं. काही दिवसांनंतर सागरने त्याच्या वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असं त्याला सांगण्यात आलं होतं. शिवाय, १०० टक्के टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी काही रक्कम भरावी लागेल. असे म्हणत सायबर चोरट्यांनी अभिनेत्याला आणखीन १९ लाख रुपये आणि त्यावर ३०टक्के कर भरण्यास भाग पाडलं, अशा प्रकारे अभिनेत्याकडून त्या चोरट्यांनी ६१ लाख रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. अभिनेत्याला त्या चोरट्यांनी तुम्ही भरलेला कर चुकीच्या अकाऊंटमध्ये गेला आहे, असं सांगितलं. त्यामुळे तुम्हाला आणखीन पैसे गुंतवावे लागतील. पैसे मिळत नसल्याने अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्याने लगेच पोलिसांत धाव घेतली.