वरूण धवनच्या बेबी जॉनबाबत माहिती (फोटो सौजन्य - Instagram)
वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे 2024 सालातील सर्वात मोठे ॲक्शन एंटरटेनर म्हणून वर्णन केले जात आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये वरुण धवन ॲक्शन अवतारात दिसत आहे. हा चित्रपट आधी VD18 म्हणजेच वरुणचा 18वा चित्रपट म्हणून प्रमोशन केला जात होता. या चित्रपटाच्या चर्चेचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा चित्रपट ‘जवान’ दिग्दर्शक ॲटलीची निर्मिती आहे.
साहजिकच अशा परिस्थितीत चित्रपटाकडून अपेक्षा वाढतात. पण दरम्यान, ॲटलीने स्वतः पुष्टी केली आहे की ‘बेबी जॉन’ म्हणजेच VD18 हा 2016 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘थेरी’चा रिमेक आहे, जो स्वतः मणिरत्नमच्या ‘क्षत्रिय’ वरून प्रेरित होता.
‘थेरी’ हा ॲटलीचा दुसरा चित्रपट होता. याआधी त्याने 2013 मध्ये ‘राजा रानी’मधून लेखक-दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता. ‘थेरी’मध्ये थलपथी विजयसोबत सामंथा रुथ प्रभू आणि एमी जॅक्सन मुख्य भूमिकेत दिसून आल्या. ॲटलीच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाच्या कथेलाही अनेक फाटे आहेत. ही कथा एका बापाची आहे जो आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. थलपथी विजयचे तीन वेगवेगळे अवतार चित्रपटात पाहायला मिळतात.
बेबी जॉनमध्ये एक हिरो दोन हिरॉईन
‘बेबी जॉन’ चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत. जसे ‘थेरी’चित्रपटात एक नायक आणि दोन नायिका होत्या. ॲटली आणि त्याची पत्नी प्रिया ॲटलीसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. हे कालीस्वरण यांचे आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लूएंसरचा Private Video लीक, इंटरनेट विश्वात खळबळ
मूळ चित्रपट थेरीची कहाणी
‘थेरी’च्या कथेत जोसेफ कुरुविला आहे, ज्याला हिंसा आवडत नाही. तो केरळमध्ये बेकरी चालवतो आणि त्याची पाच वर्षांची मुलगी निवेदिता ‘निवी’ हिच्यासोबत शांत जीवन जगत आहे. जोसेफ लवकरच निवीच्या टीचर ॲनीशी मैत्री करतो. ॲनीचा जोसेफवर क्रश आहे. दरम्यान, काही गुंड निवीला मारण्याचा प्रयत्न करतात. जोसेफ त्यांच्याशी हाणामारी करतो. ॲनीला कळते की जोसेफ प्रत्यक्षात डीसीपी विजय कुमार आहे. यानंतर जोसेफ ॲनीला त्याच्या मागील आयुष्याबद्दल सांगतो आणि त्याचे आयुष्य या चित्रपटातून उलगडलेले दाखवले आहे.
वरूणचा वेगळा अवतार
यानंतर कथेत काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. ॲटलीने लिहिलेल्या या कथेला ॲक्शन, इमोशन आणि सस्पेन्सचा भक्कम डोस आहे यात शंका नाही. आता वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ हा या चित्रपटाचा रिमेक असेल तर बॉक्स ऑफिसवर तो काय यश मिळवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसे, माहितीसाठी, 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘थेरी’चे बजेट 75 कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याचे निव्वळ कलेक्शन 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. त्यामुळे आता या चित्रपटाकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत.
बेबी जॉनचा ट्रेलर